भाकपा ने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना दिले निवेदन
शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
भद्रावती तालुक्यातील नंदोरी आणि चंदनखेडा या भागातील शेत जमीन वेकोली मध्ये जाणार असल्याची चर्चा होतास शेतकऱ्यांन कडून फेरफार करून देण्याच्या नावाखाली येथील मंडळ अधिकारी प्रशांत नरेंद्र सिंग बैस हे पैशाची मागणी करत होते याच प्रकरणात एक एप्रिल रोज गुरुवारला तहसील कार्यालयात शेत जमिनीचा फेरफार करून देण्यासाठी एक हजार पाचशे रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली होती. बैस नी याच माध्यमातून करोडोची माया जमवली आहे. त्यांच्या या संपत्तीची चौकशी करून त्यांचे निलंबन करण्यात यावे या मागणीचे निवेदन भाकपा जिल्हा सहसचिव राजू गैनवार यांनी तहसीलदार महेश शितोळे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांना पाठविण्यात आले.
नंदोरी साजातील कोंढा, चालबर्डी,कोंडाळी, हरदाडा (रिठ) किलोनी, खंडाळा (रिठ), टाकळी, वडाळा,आष्टी (रिठ) डोंगरगाव खडी, गोटाळा,भटाळी,नंदोरी, विस्लोन, पळसगाव हा भाग प्रस्तावित वेकोली (डब्ल्यूसीएल) कोळसा खाणी करिता संपादीत केला जाणार आहे. या भागातील शेत जमीन मालकांनी आपल्या नावावर असलेल्या शेतीचे तुकडे करून ते आपल्या मुलाच्या, पत्नीच्या,मुलीच्या नावे करण्याकरिता शेतीचे तुकडे भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून शेतीची मोजणी करून तुकडे पाडून नंतर ते वेगळे केल्या जाते. परंतु या भागातील मंडळ अधिकारी बैस यांनी पैसे घेऊन कागदोपत्री तुकडे पाडून फेरफार करीत होते. असाच प्रकार येथील शेतकरी बापूराव एकरे यांना मंडळ अधिकारी यांनी फेरफार साठी आठ हजार रुपयांची मागणी केली होती. या घटनेची तक्रार सुध्दा घटनेच्या पहिले तहसीलदार महेश शितोळे यांच्याकडे देण्यात आली होती .तसेच मंडळ अधिकारी हे पाटाळा साजात असताना रेती तस्करांन कडून करोडोची माया त्यांनी जमवली आहे .अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करून त्याला निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, विभागीय आयुक्त (महसूल), जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी यांना निवेदन तहसीलदार मार्फत पाठविण्यात आले यावेळी भारतीय कॅम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव राजू गैनवार, लिमेश माणुसमारे ,सुनील रामटेके, सागर भेले, मुकेश कांबळे आदी उपस्थित होते.