नागपूर, दिनांक १० एप्रिल
वाढत्या कोरोनाचा प्रकोप बघता या वर्षी सुद्धा हिंदू नवीन वर्ष व श्रीराम नवमी मोठ्या प्रमाणात सार्वजनिकरीत्या न करता आपल्या घरीच साजरी करण्याचे आवाहन विहिंप तर्फे करण्यात आले.
नववर्षा निमित्त घरावर भगवा ध्वज, पताका लावून सायंकाळी घरासमोर रांगोळी ,मंदिरांवर रोषणाई करत नातेवाईक व परिसरातील नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन तसेच रामरक्षा , हनुमान चालीसाचे पठण करून घरीच साजरा करण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी केले.
दिनांक १३ एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान विहिंप तर्फे राम महोत्सव साजरा केल्या जाणार असून या वर्षी श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान निमित्त संपर्कीत अश्या सगळ्या वस्त्या तसेच गावांमध्ये राम महोत्सव साजरा करणार आहे. या महोत्सवात रामरक्षा पठण, श्रीराम जय राम जय जय राम विजय महामंत्राचा जप, भजन व रामधून इत्यादी कार्यक्रम रामभक्तांनी करावे असे आवाहन विहिंप ने केल्याचे प्रांत प्रचार प्रसार प्रमुख निरंजन रिसालदार यांनी कळविले. भगवे ध्वज विहिंप कार्यालय धंतोली येथे विक्रीस उपलब्ध आहे.