चंद्रपूर जिल्हा कारागृहातील ४५ वर्षावरील बंदीबांधवाकरिता कोरोना लसीकरणाच उपक्रमाची सुरवात
दि.०९/०४/२०२१ शुक्रवार :- मा. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांनी कारागृहातील ४५ वर्षावरील बंदी बांधवाना कोरोना लसीकरण करण्याचे निर्देश दिलेले आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्हा कारागृह वर्ग-१ येथे कारागृह अधीक्षक श्री. वैभव आगे यांचे मार्गदर्शानामध्ये ४५ वर्षावरील बंदी बांधवाची कोरोना लसीकरणाकरिता नोंदणी करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. सध्यास्थित कारागृहातील २१ बंदी बांधवांचे कारागृह वरीष्ठ तुरुंगाधिकारी श्री. वैभव आत्राम यांचे वतीने आनलाईन नोंदणी करण्यात आलेली असून कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित डांगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे समन्वय करुन बंद्याकरिता दिनांक ०९/०४/२०२१ व दिनांक १०/०४/२०२१ रोजी लसीकरणाचे सत्र आयोजित केलेले असून आज दिनांक ०९/०४/२०२१ कारागृहातील ११ बंदीबांधवांना यशस्वीरित्या कोरोनाची लस देण्यात आलेली असून दिनांक १०/०४/२०२१ रोजी १० बंदी बांधवांना लस देण्यात येणार आहे. तसेच उर्वरीत पात्र बंद्याना त्यांचे ऒनलाईन नोंदणी करुन कोरोनाची लस देण्याचे प्रस्तावित असून कारागृहातील ४५ वर्षा वरील बंदीबांधवाचे प्रति दिन १० याप्रमाणे लस दिली जाणार असल्याचे कारागृहाचे वरीष्ठ तुरुंगाधिकारी श्री. वैभव आत्राम यांनी कळविले असून सदर लसीकरणाचे उपक्रमासाठी कारागृहाचे वतीने कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित डांगेवार, तुरुंगाधिकारी श्री विठ्ठल पवार, कारागृहाचे फार्मासिस्ट श्री. आय एच इनामदार, तुरुंग शिक्षक ललित मुंडे, नर्सिंग अर्डली गौरव पाचडे , लिपीक अजय चांदेकर, शिपाई श्री रिंकू गौर, महिला शिपाई श्रीमती प्रिया नारनवरे व इतर कारागृह कर्मचारी हे विशेष परिश्रम घेत आहे.