जागतिक वन दिवस उत्साहात साजरा
नवेगावबांध ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.22 मार्च:-
संयुक्त वनव्यवस्थापन समिती नवेगाव बांध च्या वतीने ग्रामपंचायत परिसरात जागतिक वन दिवस दिनांक 21 मार्च रोज रविवार ला उत्साहात साजरा करण्यात आला जागतिक वन दिवसानिमित्त जनजागृती, वृक्षारोपण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा नवेगावबांध ग्रामपंचायतचे सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, समितीचे सचिव एम. आर. चौधरी, सदस्य खुशाल काशिवार, सतीश कोसरकर शितल राऊत, अनिशा पठाण, ललिता गहाणे प्रामुख्याने उपस्थित होते. संयुक्त वनव्यवस्थापन समिती च्या वतीने जागतिक वन दिनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्थ करून जळणासाठी लाकडांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने समिती 100% एलपीजी गॅस कनेक्शन वाटप करण्याकरता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग निहाय यादी तयार करून सादर करण्यात येणार आहे. मानव व वन्य जीव संघर्ष कमी करण्यासाठी उपाय योजना,वन वणवा लागण्याची कारणे व आग प्रतिबंधक उपाय योजना यावर मार्गदर्शन करण्यात आले. जागतिक वन दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य व नवेगावबांध ग्रामवासी उपस्थित होते. कार्यक्रमात कोरोना प्रोटोकॉल पाळण्यात आले.