Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च २२, २०२१

बोधनकर, मेश्राम, कांबळे यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

 बोधनकर, मेश्रामकांबळे यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन



            नागपूर दि. २१ : नागपूर शहराचे नावलौकिक वाढविणारे ज्येष्ठ पत्रकार मेघनाथ बोधनकरमाजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्रामअभियंते किरण कांबळे यांच्या निधनामुळे शहराच्या जनजीवनात वैचारिकशैक्षणिक आणि सामाजिक पोकळी निर्माण झाल्याचे प्रतिपादन ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

            काल शनिवारी कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या संदर्भात वेगवेगळ्या स्तरावरील बैठकांचे आयोजन पालकमंत्री राऊत यांनी केले. त्यानंतर सायंकाळी त्यांनी गेल्या आठवड्यात निधन झालेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

मेघनाथ बोधनकर

            महाराष्ट्रातील इंग्रजी पत्रकारितेतील आदराचे नाव, लोकमत टाइम्सचे सल्लागार संपादकहितवादचे संपादक तसेच छत्तीसगडमध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात विविध वृत्तपत्राचे संपादक मेघनाथ बोधनकर यांचे गेल्या रविवारी निधन झाले. राज्याचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन बोधनकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. बोधनकर यांची पत्रकारिता दीर्घकाळ त्यांच्या या क्षेत्रातील कर्तुत्वाचा परिचय देत राहीलपत्रकारिता क्षेत्रातील एक ज्येष्ठ सहकारी काळाच्या पडद्याआड गेल्याचे दुःख त्यांनी यावेळी व्यक्त केले.

डॉ. सुधीर मेश्राम

            कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे माजी कुलगुरू दिवंगत डॉ. सुधीर मेश्राम यांच्या निवासस्थानी ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी भेट दिली. त्यांच्या जाण्यामुळे विद्यार्थीप्रिय तत्त्ववेत्ता गमावल्याचे दुःख असल्याची भावना यावेळी पालकमंत्री राऊत यांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात पत्नी रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम, मुलगा सिद्धार्थ यांच्याशी यावेळी          डॉ. राऊत यांनी सुधीर मेश्राम यांच्या सामाजिक बांधीलकीबद्दल जुन्या आठवणी सांगितल्या. एका विद्वान मित्राला गमावल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले.

किरण तुकाराम कांबळे

            विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंते दिवंगत किरण तुकाराम कांबळे यांच्या घरी शनिवारी पालक मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. किरण कांबळे यांचे 19 मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी वंदनामुलगा संकल्प आणि मुलगी प्रचिती आहे. संकल्प या समाजसेवी संस्थेचे पदाधिकारी होते त्यामुळे डॉ.राऊत यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.     


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.