सिंदेवाही तालुक्यातील उमा नदीवर रेतीतस्करांचा धुमाकूळ सुरु असून याकडे तहसील प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.रात्रीच्या सुमारास उमा नदीवरून सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव गंणा, मोहबळी,चक बामणी,उक्रेडी, विसापूर या गावात रेतीचा मोठा साठा तयार करून ठेवला जातो. आणि हि रेती गावात तसेच इतर ठिकाणी ज्यादा दराने विकल्या जाते.या भागातील सचिन,प्रदीप,किशोर हे रेती तस्कर सक्रिय असून रात्रीच्या सुमारास उमा नदीवरून ट्रॅक्टर द्वारे रेतीची वाहतूक राजरोसपणे सुरु आहे.अदयाप चंद्रपूर जिल्ह्यातील काही रेतीघाटांचा लिलाव झालेला नाही.अशातच रेती तस्कर सक्रिय झाले असून सिंदेवाही तालुक्यातील उमा नदीवर रेतीतस्करांचा धुमाकूळ सुरु असून याकडे तहसील प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.या सर्व प्रकारामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असून रेती तस्करांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.