चंद्रपूर- मनपाने शहरातील काही भाग पूरग्रस्त रेषेत टाकल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या वतीने मनपासमोर आंदोलन करण्यात आले.चंद्रपूर शहर महानगरपालीकेच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रवादी नगर, तुळशी नगर,वडगाव आकाशवाणी परीसर,जगन्नाथ बाबा नगर, नगीणाबाग व ईरई नदिला लागुन असलेला काही भाग महानगर पालीकेच्या दुर्लक्षतेमुळे पुरग्रस्त रेषेत टाकण्यात आलेला आहे.वास्तविक हा भाग पुरप्रस्त नाही.गेल्या अनेक वर्षापासुन जनता वास्तव्य करीत आहे आणी या वस्तीतील बहुतांश लोकांनी परावर्तीत लेआऊट मधील प्लाट घेऊन महानगर पालीकेची परवानगी घेऊन आपल्या स्वप्नातील घरे बांधली आहे. मात्र महानगरपालीकेने पुरग्रस्त जनतेला वाऱ्यावर सोडले. जलसंपदा विभागाने महानगर पालिकेला नवीन सर्वेक्षणसाठी दिलेल्या नोटिस मध्ये ७० ते ८० लाख भरण्यासाठी सांगितले.परंतु महानगरपालीकेने पैसे भरल्यास नकार दिला.अशातच महानगरपालीकेने पुरग्रस्त जनतेला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या वतीने मनपासमोर आंदोलन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती .
शहरातील काही भाग पूरग्रस्त रेषेत टाकल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे मनपासमोर आंदोलन