शरजिल उस्मानी या एका नाकर्त्या इसमाने पुण्यात येऊन एल्गार परिषदेमध्ये समस्त हिंदु समाजाला सडक्या वृत्तीचे म्हंटले आणि असे म्हंटल्यावर सुद्धा महाराष्ट्र शासन व महाविकास आघाडीचे पोलीस शरजिल उस्मानी विरोधात काहीही करवाही करत नव्हते. भारतीय जनता युवा मोर्चाने भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रदिप गावडे यांच्या नेतृत्वा विषयाचा सतत पढपुरावा करत पुण्यामध्ये शरजिल उस्मानी विरोधात एफ.आय.आर दाखल झाली. काल शरजिल उस्मानी पुण्यामध्ये आला असतांना त्याच्यावर केवळ १५३ (अ) ही कलम लावण्यात आली. जेव्हा कोर्टने विचारले की समाजात धार्मिक तेढ निर्माण करणार्या विरोधात कलम १९५ का कारवाही केली गेली नाही त्याचे सुद्धा पोलीस उत्तर द्यायला समर्थ नव्हते. त्याला जामिन मिळवण्यास मदत करतांना देखील पोलीस विभाग कुठे ना कुठेतरी दिसतो आहे असे आढळले. भारतीय जनता युवा मोर्चा ह्यां प्रकारच्या वक्तव्यांना खपऊन घेऊ शकत नाही. महाविकास आघाडी शरजिल उस्मानीला सुद्धा पाठीशी घलण्याचा प्रयत्न करते आहे. या अगोदर महाविकास आघाडीनी काय काय केले हे आपल्या सर्वांना महिती आहे. कोरोनाचा प्रदुर्भाव लक्षात घेता सांकेतिक स्वरूपात सोशल डिस्टंसिंग पाळुन आज कोरोना असल्यामुळे नागपुरमध्ये ६ ही मंडळात आंदोलन करण्यात आले.
आजचे सर्व आंदोलन प्रमुख्याने भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात झाले. दक्षिण-पश्चिम नागपुरात मंडळ अध्यक्ष यश सातपुते, दक्षिण नागपुरात मंडळ अध्यक्ष अमर धरमारे, पुर्व नागपुरात मंडळ अध्यक्ष सन्नी राऊत, मध्य नागपुरात मंडळ अध्यक्ष बादल राऊत , पश्चिम नागपुरात मंडळ अध्यक्ष शेखर कुर्यवंशी, उत्तर नागपुरात मंडळ अध्यक्ष पंकज सोनकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने प्रदेश सचिव राहुल खंगार, कल्याण देशपांडे, सदस्य रितेश रहाटे प्रामुख्याने उपस्थित होते.