Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च ११, २०२१

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांचे वतीने कारागृहातील महिला बंदी भगीनी यांचे करिता जागतिक महिला दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांचे वतीने कारागृहातील महिला बंदी भगीनी यांचे करिता जागतिक महिला दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन



 

दि.०८/०३/२०२१ सोमवार  :-   चंद्रपूर जिल्हा कारागृह वर्ग-१ येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांचे वतीने महिला बंदीभगिनी करिता  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सन्मान्या.जाधव साहेब सचिवजिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये कारागृहाचे प्रभारी अधीक्षक वैभव आत्राम,अतिरिक्त वरीष्ठ तुरुंगाधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.सपना बिरेवार, कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित डांगेवार, अंतर्गत तक्रार निवारण समिती सदस्या डॉ.भारती दुधानी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर च्या पी.एल.व्ही श्रीमती संध्या तोगर,  तुरुंग शिक्षक ललित मुंडे उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आलेकार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित डांगेवार यांनी कार्यक्रमाचे स्वरुप महिला बंदीवांनाना समजावून सांगीतलेतदनंतर कारागृहाचे प्रभारी अधीक्षक वैभव आत्राम यांनी सर्व महिला बंदी यांना जागतिक महिला दिनाचे शुभेछ्या दिल्या व सर्व महिला बंदी व महिला कर्मचारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व आरोग्य शिबीराचा लाभ घेण्याबाबत सांगीतले. तर अध्यक्षीय भाषणामध्ये सन्मासन्मान्या.जाधव साहेब,सचिवजिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी महिला बंदी भगिनी यांना जागतिक महिला दिनाचे शुभेछ्या देत सर्व महिलांमध्ये दया, करुणा, ममता हे उपजत दैवी गुण असल्याने पुरुषांचे तुलनेत त्यांचे अपराधामध्ये प्रमाण अत्यल्प असल्याचे प्रतिपादन केले तसेच सर्व महिला बंद्यानी सुटून समाजात परत गेल्यावर कधीही पुन्हा अपराधी कृत्य करु नये असे आव्हान केले.  तदनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सपना बिरेवार मॅडम यांनी महिला बंद्याची आरोग्य तपासणी केली. यावेळी अंतर्गत तक्रार निवारण समिती सदस्या डॉ.भारती दुधानी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर च्या पी.एल.व्ही श्रीमती संध्या तोगर यांनी प्रत्येक महिला बंद्याना साडी व शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तुरुंग शिक्षक ललित मुंडे यांनी केलेसदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कारागृहाचे सुभेदार देवाजी फलके  महिला शिपाई रुपाली राठोड, उषा शाहू, हर्षा सिरिया, माधुरी नन्नावरे, पुजा कांबळे, रुपाली घोरपडे, प्रिया नारनवरे इत्यादीं  महिला  कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.