रद्दच्या निर्णयाने परीक्षार्थी संतप्त, जोरदार घोषणाबाजी
- मंगेश दाढे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) १४ मार्च रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयावर विचार होऊ शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव व एमपीएससीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचे समजते. कोरोना काळात अनेक जिल्ह्यामध्ये लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आरोग्यसेवक पदाची परीक्षा होऊ शकते, तर एमपीएससीची परीक्षा का नाही? असा संतप्त सवाल परीक्षार्थी उमेदवारांनी उपस्थित केला आहे. यावरून प्रचंड मोठा रोष दिसून येत आहे. या निर्णयाविरोधात पुण्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. तर तिकडे औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावतीसह अन्य जिल्ह्यामध्येही परीक्षार्थी संतप्त झालेले आहेत. एमपीएससी विरोधात परीक्षार्थीनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. एमपीएससीने काढलेल्या पत्रकात आगामी काळात परीक्षा कधी होणार? ही बाब अजूनही स्पष्ट केलेली नाही.