होळी,धुलीवंदन घरीच साजरी करा - ठाणेदार जनार्दन हेगडकर
कोरोना संसर्गाविषयी नागरिकांनी काळजी घ्यावी.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.28 मार्च:-
येत्या रविवार दि 28 मार्च व सोमवार दि.29 मार्च या दोन दिवशी होळी व धुलीवंदन हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहेत. एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करून साजरा होत असतो. परंतु सध्या covid-19 या रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नवेगावबांध पोलीस स्टेशन हद्दीत होळी व धुलीवंदन हे सण कुठे ही आपण सार्वजनिकरीत्या साजरे न करता आपण आपल्या घरामध्ये व घरासमोर साजरी करावी. जेणेकरून कोणालाही covid-19 या रोगाचा संसर्ग होणार नाही. याची आपण दक्षता घ्यावी. असे आवाहन नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांनी केले आहे. आपली व इतरांची काळजी घ्यावी. तसेच सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे जमावबंदी आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने कोणीही पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये. याची दक्षता घ्यावी आपली व आपल्या कुटुंबाची व आपल्या मित्रांची काळजी घेणे व कोणालाही कोवीड रोगाचा संसर्ग होवु नये. याची आपण काळजी घेवुन आपण प्रशासनास सहकार्य करावे.असे आवाहन ठाणेदार जनार्दन हेगडकर सहायक पोलिस निरीक्षक
नवेगावबांध पोलीस ठाणे यांनी केले आहे.