चंद्रपूर: येथील बस स्थानक परिसरामध्ये एका प्रवाशाचा पाकीट पडलेला होता. तिथे ड्युटीवर तैनात असलेले अमलदार इस्माईल शेख आणि पोलीस शिपाई सुमित चव्हाण यांनी या पाकिटाची तपासणी केली. त्यात वाहन चालवण्याचा परवाना, एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि साडेसातशे रुपये होते. ओळखपत्राच्या आधारावर संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यात आली. सदर पाकेट यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील प्रवासी पुरुषोत्तम दहेगावकर यांचा असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधून रोख रकमेसह तो पाॅकेट परत केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शुक्रवार, मार्च ०५, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments