खासदारांनी दिल्या लोकसभेत राष्ट्रीय आयोग बिल २०२० वर लोकाभिमुख सूचना
चंद्रपूर : नागरिक आणि रुग्ण हे महत्वाचे नाते आहे. भारतातील शेवटच्या वर्गाला आरोग्य व्यवस्था माफक दरात मिळावी, इतर देशाच्या तुलनेत भारताच्या हेल्थ बजेट वाढवावा, भारतात १३४२ रुग्णाच्या मागे एक डॉक्टर आहेत, त्यामुळे ती संख्या वाढवावी, त्यासोबतच खासगी रुग्णालयात रोगाच्या उपचारावर मोठ्या प्रमाणात खर्च घेण्यात येतो. त्यामुळे शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी होत असते. त्यामुळे देशातील प्रत्येक खासगी रुग्णालयात रोगाचा अनुषंगाने उपचाराचा खर्च घ्या अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली. ते लोकसभेत राष्ट्रीय आयोग २०२० या बिलावर बोलत होते.
भारतात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग आहेत. आता देखील ग्रामीण भागापर्यंत आरोग्य व्यवस्था पोहचलेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिल्हा रुग्णालयावर भार येत असतो. देशात ५९ टक्के रेडिओग्राफर चा तुटवडा आहे. त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पॅथॉलॉजी लॅब नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना शहरात यावं लागते त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. २०१९ मध्ये भारत मिशन पब्लिक हेल्थ केअर वर १.२८ टक्के खर्च करण्यात आला आहे. इंडोनेशिया आणि श्रीलंका या देशाच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे बजेट मध्ये आरोग्यावर भरीव तरतूद करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली.
समाजाच्या सर्वात शेवटच्या वर्गात जाऊन आरोग्य कर्मचारी सेवा देत असतात. कोरोना काळात तुलनात्मक विचार केल्यात सर्वात जास्त काम यांनी केलं आहे. त्यामुळे या बिलात त्यांच्यासाठी मोठी तरतूद करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. आरोग्य व्यवस्थेत काही तक्रारी झाल्यास ५० हजार दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. ती रक्कम वाढविण्याची व कारवाईत सुधारणा करण्याची महत्वाची सूचना त्यांनी केली.