थेलेसेमिया साठी एच. एल. ए व इतर मोठ्या आजारांसाठी NAT टेस्ट सुविधा देण्याची लोकसभेत मागणी
चंद्रपूर : चंद्रपूर - वाणी- आर्णी लोकसभा क्षेत्रातील आरोग्य विषयक समस्यांवर लोकसभेत बोलताना खासदार बाळू धानोरकर यांनी थॅलेसिमिया रुग्णांसाठी एच. एल. ए टायपिंग टेस्ट थॅलेसिमिया नोंदणी झालेल्या ६५ रुग्णांसाठी ल्युकोसाइट फिटर टेस्ट, एच. आय. व्ही, एच बी. हेपाटायटीस बी. सी टेस्ट या आजाराच्या तपासणीसाठी सध्या एलिसा टेस्ट असून हि चार ते आठ आठवड्याने रीपोट मोडणारी वेळ कडू पद्धत असल्याने NAT न्यूक्लिएफ ऍसिड टेस्ट ची व्यवस्था शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली.
चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी व कामगार वर्ग आहे. जिल्ह्यात सिकलसेल, Thalassemia या रोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येतात. ग्रामीण भागात पॅथॉलॉजी लॅब नसल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात यावं लागत. त्यांना वेळ व पैशाची खर्च करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यात ग्रामीण भागात हि सुविधा उपलब्ध करून देण्याची लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी आरोग्य मंत्र्यांना केली.