#चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 109 जणांनी #कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 276 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. सध्या 1480 बाधितांवर उपचार सुरू आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 109 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 276 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 26 हजार 244 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 351 झाली आहे. सध्या 1480 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 59 हजार 894 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 27 हजार 916 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 413 बाधितांचे मृत्यू झाले आहे. आज बाधीत आलेल्या 276 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 120, चंद्रपूर तालुका 29, बल्लारपूर 11, भद्रावती 18, ब्रम्हपुरी 12, नागभिड तीन,सिंदेवाही 14, मूल सात, सावली चार, पोंभुर्णा एक, राजूरा चार, वरोरा 40, कोरपना सात व इतर ठिकाणच्या सहा रुग्णांचा समावेश आहे.
#गडचिरोली जिल्हयात आज 39 नवीन #कोरोनाबाधित आढळून आले. तर 20 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. सद्या 360 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
आज जिल्हयात 39 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 20 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज एक मृत्युमध्ये 62 वर्षीय महिला इतर जिल्ह्यातील होती. नवीन 39 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 16 जणाचा समावेश असून अहेरी तालुक्यातील 10, आरमोरीर तालुक्यातील 8, चामोर्शी तालुक्यातील 2, कुरखेडा तालुक्यातील 1, मुलचेरा तालुक्यातील 1, वडसा तालुक्यातील 1,जणाचा समावेश आहे. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील कारमेल शाळा 1, नवेगाव 2 ,रेड्डी गोडावून 1, बालाजी नगर 1,कन्नमवार वार्ड 1,कारमेल शाळाचे मागे 1,स्थानिक 1, विसापूर 1,विश्राम भवन 1,आशिर्वाद नगर 2,आंनद नगर 1,पंचायत समिती 2, रामनगर 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये नागेपल्ली 3, स्थानिक 2, आलापल्ली 2, फारेस्ट कॉलनी 2, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये तहसिल कार्यालय जवळ 1, ताडुलवार नगर 3, इंदिरा नगर 1, स्थानिक 1, जिल्हा परिषद शाळा पिसे वाडा 1, भगतसिंग चौक 1, चामोर्शी तालुक्यातील कोनसरी 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, मूलचेरा तालुक्यातील रविंद्रनाथ टागोर शाळे जवळ 1, वडसा तालुक्यातील हनुमान वार्ड 1, यांचा समावेश आहे.