कोंढाळी : महावितरण कंपनीने जनतेला पाठविलेले वाढीव बिल च्या विरोधात हल्ला बोल आंदोलनात कोंढाळी वीज महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकून कोंढाळी चे उपकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी काटोल तालुका कार्याध्यक्ष व माजी उपसभापती योगेश चाफले म्हणाले राज्य सरकारने करोना काळात वीज माफीचा शब्द पाळला नाही. शिवाय वीज दरवाढ केली. त्यामुळे आम्हाला आंदोलन छेडावे लागत आहे. आंदोलनात ग्रा. पं. सदस्य प्रमोद शेषरावजी चाफले,भाजपा शहराध्यक्ष बालकिसन पालीवाल, युवा नेते मुन्ना शेंगर , प्रमोद धारपूरे, ग्रा. पं. सदस्य नितीन देवतळे, भीमराव गोंडाणे,विलास झाडे, , वैभव जयपरकर, प्रवीण गायधने, प्रमोद वासुदेवराव चाफले, गोविंदा गजबे, अंकित पालीवाल, लखन, आदी भाजपा कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आघाडी सरकारने शब्द पाळला नाही- योगेश चापलेराज्य सरकारने वीज माफी व दरवाढ निर्णयावर घुमजाव केला शब्द पाळला नाही असे मत प स काटोल माजी उपसभापती योगेश चापले यांनी आंदोलन प्रसंगी व्यक्त केले