तहसील कार्यालया समोर शिवसेनेची निदर्शन
#पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घ्या...घोषणाबाजी
काटोल : देशात पेट्रोल - डिझेल दरवाढनी भडका घेतलेचे निषेधार्थ शिवसेनेने तहसील कार्यालया समोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजु हरणे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी तहसील कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली . यावेळी राजू हरणे म्हणाले , पेट्रोल ९४ रुपये लिटर तर डिझेल ८३ रुपये झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर वाढविल्याने ट्रान्सपोर्ट व्यवसायाला फटका बसला आहे.
तेव्हा केंद्र सरकरने पेट्रोल व डिझेलचे दर वाढ मागे घ्यावी . कोरोना संक्रमणामुळे अनेकांची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. शेतकरी यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे चिंतेत आहे. त्यात आंब्या बहाराच्या संत्र्याला भाव नाही. मृग बहाराची संत्री कमी प्रमाणात आहे. यावर्षी शेतीला लावलेले पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या हाती आले नाही. अश्यावेळी केंद्रसरकारने नागरिकांना दिलासा देण्याएवजी पेट्रोल - डिझेलचे दर वाढवून सर्वसामान्यांची लुट केली आहे. रोजगार नसल्याने युवक हतबल झाला आहे. छोटे - मोठे व्यवसाय ठप्प अवस्थेत आहे.
अशावेळी डिझेल - पेट्रोलची दरवाढ करून पुन्हा आर्थिक फाटका बसला आहे. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हप्रमुख जेष्ठ नेते पुरूषोत्तम धोटे, शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत मानकर, शिवसेना महिला आघाडीच्या निताताई भोंडे, शिवसेना काटोल शहर प्रमुख विपुल देवपूजारी, विभाग प्रमुख माधव आनवाने, संजय काळे, संजय खानवे , दीपक गुजर, युवासेना काटोल शहर प्रमुख मिथील राऊत, उपशहर प्रमुख हर्षल चुटके, सूरज भस्में आदींसह नागरिक उपस्थित होते