दिड कोटी मंजुर, निवीदा प्रकीया सुरु
काटोल, प्रतिनीधी
काटोल शहरात स्पर्धा परिक्षा केंद्र व्हावी अशी मागणी केल्या अनेक दिवसांपासुन होती. यासाठी सात्यत्याने प्रत्यत्न करण्यात आले. यात यश आले असून मानव विकास योजनेच्या माध्यमातुन काटोल येथे अदयावत स्पर्धा परिक्षा केंद्राला मंजुरी मिळाली आहे. बंद असलेल्या कन्या शाळेमध्ये हे केंद्र सुरु होणार असून यासाठी १ कोटी ५५ लाख रुपये मंजुर झाले असून या कामाची निविदा प्रकीया सुरु असल्याची माहीती जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी दिली.
काटोल व नरखेड तालुक्यातील अनेक विदयार्थी हे स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असतात. यात प्रामुख्याने युपीएससी, एमपीएससी सह इतर स्पर्धा परिक्षांचा समावेश आहे. यासाठी विदयार्थ्यांना नागपूर किंवा दुसरीकडे जावे लागत होते. यामुळे याचा आर्थीक फटका हा त्यांना बसत होता. याठी हे केंद्र काटोल येथे व्हावे याची मोठया प्रमाणात मागणी होती. ही मागणी लक्षात घेता या केंद्राच्या मंजुरीसाठी सातत्याने सलील देशमुख यांनी पाठवुरावा केला. काटोल येथील बंद असलेल्या कन्याशाळेचा यासाठी वापर करण्याचे ठरले.
परंतु येथे अनेक सुविधांचा अभाव असल्याने त्यासाठी निधीची आवश्यकता होती. यासाठी मानव विकास योजनेतुन पैश्यांची तरतुद करण्यात आली असून १ कोटी ५५ लाख रुपये मंजुर करण्यात आले आहे. मंजुर करण्यात आलेल्या निधीमधुन ६४ लाख रुपये हे स्पर्धा परिक्षा केंद्रांची स्थापना करणे, ५८ लाख रुपये केंद्रासाठी संगणक व इतर आवश्यक साहित्य खरेदी करणे तर ३३ लाख रुपये हे केंद्राचे संचलन व व्यवस्थापनासाठी मंजुर करण्यात आले आहे. या केंद्रात अदयावत ई लॅबसह इतर आवश्यक त्या सुर्व सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती सलील देशमखु यांनी दिली.
तज्ञांचे मिळणार मागर्दशन
या स्पर्धा केंद्रात ग्रामिण भागातील सुवक व युवतींना परिक्षेमध्ये यश मिळण्याच्या दुष्टीने सदर मागर्दशन केंद्राचा लाभ व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी देशातील विविध तज्ञ मंडळींना मागर्दशनासाठी या केंद्रात बोलवण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग व संघ लोकसेवा आयोगाच्या परिक्षेला बसणाऱ्या ग्रामिण भागातील मुलांना या मागर्दशन केंद्रामुळे ग्रामिण भागात सुविधा उपब्ध होणार आहे.