खेमजईत रंगले बहारदार कविसंमेलन
अशोक साळवे यांचा षष्ठाब्दीपुर्ती सोहळा : जिल्ह्यातील कवींच्या उपस्थितीने गावकरी भारावले
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील खेमजई येथे सामाजिक कार्यकर्ते अशोक शंकर साळवे यांच्या षष्ठाब्धीपुर्ती सोहळ्यानिमीत्त जिल्ह्यातील निमंत्रितांचे कविसंमेलन बहारदारदार कवितांनी रंंगले. जिल्ह्यातील कविंच्या उपस्थितीने गावकरीही भारावले. सामाजिक जाणिवा, प्रेम हास्य कवीतेच्या माध्यमातून ग्रामप्रबोधन घडून आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.प्रमोद गंपावार तर अध्यक्ष माजी सरपंच नारायन कापटे, विलास चौधरी उपस्थित होते. आयुष्याचा खडतर प्रवास करत यश संपादन करणारे सामाजिक कार्यकर्ते अशोक शंकर साळवे यांचा षष्ठाब्धीपुर्ती सोहळ्यानिमीत्त त्यांचा गावक-यांकडून सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या. पं.स.पोंभुर्णाचे गटविकास अधिकारी व खेमजई गावचे सुपुत्र कवी धनंजय साळवे व कुटुंबियांच्या पुढाकाराने गावात कविसंमेलन पार पडले.
प्रसिद्ध कवी नरेशकुमार बोरीकर यांच्या बहारदार सुत्रसंचालनात जिल्ह्यातील प्रतिथयश कवी अविनाश पोईनकर, ईश्र्वर टापरे, विजय वाटेकर, धर्मेंद्र कन्नाके, सुरेंद्र इंगळे, गोपाल शिरपूरकर, सुधाकर कन्नाके, मिलेश साकुरकर, नरेंद्र कन्नाके, पंडीत लोंढे, चंद्रशेखर कानकाटे, जयवंत वानखेडे, चंदू झुरमुरे, सुनिल बावणे, संतोषकुमार उईके, अरुण घोरपडे यांनी सामाजिक प्रबोधनाच्या कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. खेमजई येथील ग्राम पंचायतची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येवून आदर्श ग्राम घडवण्याचा कृतियुक्त संकल्प करावा, त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे मत धनंजय साळवे व मान्यवरांनी व्यक्त केले. आभार शितल साळवे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.