Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी ११, २०२१

डेरा आंदोलनातील कामगाराची तब्येत बिघडली



डेरा आंदोलनातील कामगार रोशन बुचुंडे यांची आज सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना सामान्य रुग्णालयांमध्ये भर्ती करण्यात आले.तीन दिवसापासून कमालीची थंडी असतानाही कामगार रस्त्यावर झोपत आहेत.सात महिन्यांचा पगार देण्याबाबत शासन व प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे कामगारांचे हाल होत आहेत. बहुतांशी कामगार दलित समाजाचे आहेत आणि त्यांच्या जीवाचे कमी-जास्त झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची असेल असा इशारा यावेळी जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना दिला.

दरम्यान काल आंदोलनाला भेट दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहले.राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक यांनी या निवेदनाची प्रत घेऊन आज मुंबई येथिल राष्ट्रवादी भवनमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन कामगारांच्या थकीत पगारा बाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून तातडीने पगार जमा करण्याचे निर्देश दिले अशी माहिती जयस्वाल यांनी दिली.


अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष तसेच भूमिपुत्र ब्रिगेडसह अनेक पक्ष व संघटनेच्या डेरा आंदोलनाला पाठिंबा
जनविकास कामगार संघाच्या नेतृत्वात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पाचशेच्या जवळपास कंत्राटी कामगार करोना योद्ध्यांना सात महिन्याचा थकीत पगार व दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेले किमान वेतन देण्यात यावे या मागणीसाठी मागील तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व कामगारांचे मूलं-बाळ व कुटुंबासह डेरा आंदोलन सुरू आहे. या डेरा आंदोलनाला आज तिसऱ्या दिवशीही सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचा मोठा पाठिंबा मिळालेला आहे.अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण उर्फ बाळूभाऊ खोबरागडे , प्रतीक डोर्लीकर, प्रेमदास बोरकर, अशोक टेंभरे , विशाल अलोने, गिरीधर खोब्रागडे, कम्युनिस्ट पार्टीचे राजेश पिंजनकर,भूमिपुत्र ब्रिगेडच्या डॉ.अभिलाशा गावतुरे,डॉ.सिराज खान,करूणा चालखुरे ,अनिता जोगे, माया कोसे, अॅड. प्रशांत सोनुले , अॅड..कपिल भगत,अॅड गुरनुले
यांनी आंदोलनस्थळी येऊन आपला पाठिंबा जाहीर केला तसेच यापुढील आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे जाहीर केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.