राज्य कोविड टास्क समितीचे मुख्य समन्वयक डॉ. दिपक म्हैसेकर यांचे चंद्रपूर आढावा सभेत निर्देश
चंद्रपूर, दि. 11 फेब्रुवारी : जिल्ह्यातील छोटे व्यापारी, दुकानादार ऑटोचालक, भाजी विक्रेते इत्यादीं सुपर स्प्रेडर यांचा संपर्क लोकसमुहात जास्त येत असल्याने त्यांची कोरोना तपासणी प्राधाण्याने व नियमितपणे करावी तसेच जिल्ह्यात ॲन्टीजन तपासणीच्या तुलनेत आरटीपीसीआर तपासण्या वाढवीण्याचे निर्देश राज्य शासनाच्या कोविड टास्क समितीचे मुख्य समन्वयक डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज आरोग्य यंत्रणेला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आज डॉ. म्हैसेकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुरपाम, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस उपअधीक्षक शेखर देखमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा लसीकरण अधिकरी डॉ. संदिप गेडाम, डॉ. सुधीर मेश्राम, डॉ. प्रकाश साठे प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर यांनी ॲन्टीजेन तपासणीत रूग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्यावरही काही रूग्णांमध्ये लक्षणे दिसत असल्यास त्यांची आटीपीसीआर तपासणी करण्याचे सांगितले. जिल्ह्यात माहे जानेवारी मध्ये नवीन पॉझेटिव्ह रुग्णंची संख्या कमी असली तरी त्या तुलनेत मृत्यू दर जास्त दिसून येत असल्याने कोरोना रूग्णांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी तातडीने उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात कोव्हीड-19 आजाराचे प्रमाण कमी होत असले, तरी निष्काळजी पणे वागणूक असल्यास याचे गंभीर स्वरूप दिसून येतील, याबाबत नागरीकांना सतर्क करण्याचे आवाहन त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य यंत्रणेला केले. राज्यात 15 फेब्रुवारी पासून महाविदयालये सूरू होत आहे. जिल्हयात मृत्यूचे जास्त प्रमाण हे 19 ते 50 या वयोगटातील आहे. त्यामुळे महाविद्यालय याबाबत गांभिर्याने लक्ष देऊन कोरोनाचा प्रसार होणार नाही, याबाबत काळजी घेण्याचे तसेच सर्व महाविदयालयात सॅनेटाईजर, मॉस्क आणि हॅन्डवॉश या सर्व सुविधा उपलब्ध असल्याबाबत खात्री करुन घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी प्रशासनाला केले.
जिल्ह्यात लसीकरण मोहिम 100 टक्के पुर्ण करण्याचे व नागरिकांमध्ये कोवीड लसीकरणाबाबत कुठलाही संभ्रम निर्माण होऊ नये किंवा लस घेतल्या नंतर कोणती काळजी घेतली जावी याबाबत मार्गदर्शक सूचना सामान्य नागरीकांपर्यंत पोहचविण्यासाठी उपाययोजना आखण्याचे निर्देश डॉ. म्हैासेकर यांनी यंत्रणेला दिले. लसीकरणाबाबत गैरसमज निर्माण होणार नाही याबाबत विशेष लक्ष देण्याचेही त्यांनी सांगीतले.
यावेळी जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 23 हजार 175 कोरोना बाधीत आढळल्याचे सांगितले. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर 2.52 च्या तुलनेत जिल्ह्यातील मृत्यू दर 1.69 असल्याचे तसेच कोरोना दुप्पट होण्याचे प्रमाणे महाराष्ट्राच्या 338.5 दिवसाच्या तुलनेत 1623 दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना रूग्णांसाठी जिल्ह्यातील 40 कोविड आरोग्य उपचार केंद्रात 3431 बेड उपलब्ध असून यात 2694 सामान्य, 542 ऑक्सीजन, 152 आयसीयु व 94 बेड व्हेन्टीलेशन सुविधा असणारे आहेत. जिल्ह्यात 21 आरटीपीसीआर टेस्ट सेंटर असून 45 अन्टीजन टेस्ट सेंटर आहेत. जिल्ह्यात माहे सप्टेंबर-2019 मध्ये सर्वाधिक कोरोना बाधीत रूग्ण् 7025 तर माहे मे-2019 मध्ये सर्वांत कमी 22 रूग्ण आढळले होते होते. माहे जानेवारी मध्ये 672 रुग्ण आढळले असून मृत्यू संख्या 21 होती.
कोरोना दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात 5454 या संभाव्य रुग्णसंख्या गृहीत धरून पुरेशा उपाययोजना करण्यातआल्या असल्याचेही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले. बैठकीला आरोग्य यंत्रणेचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.