आवाळपूर :- अल्ट्राटेक कम्युनीटी वेलफेअर फाऊंडेशन च्या वतीने बाखर्डी येथे गावतलाव चे भूमिपूजन अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे युनिट हेड, विजय एकरे, यांच्या मार्गदर्शनात, उपव्यवस्थापक संजय शर्मा व गावचे सरपंच अल्का पायपरे यांचे हस्ते करण्यात आले. गावतलाव निर्माण व्हावा याकरिता कर्नल दिपक डे यांनी प्रयत्नांची परिकाषा केली. यावेळी अल्ट्राटेक चे श्री.सतीश मिश्रा, संजय पेटकर, गावातील प्रतिष्ठित नागरिक हरिभाऊ जेणेकर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, ग्रामविकास अधिकारी, पारधी, ग्रा.पं सदस्य श्रीकांत राजूरकर, विनोद उरकुडे, बाळू बुचुंडे, गावातील नागरिक मेगराज पानघाटे, दिवाकर जेणेकर, अशोक मिसलवार,अल्ट्राटेक चे कंत्राटदार अरुण रागीट तथा गावकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेकरिता सचिन गोवारदीपे व देविदास मांदाळे यांनी परिश्रम घेतले.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
सोमवार, फेब्रुवारी १५, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments