Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी १५, २०२१

लोहारा जंगलातील तलावावर भरला आर्केस्ट्रा




लोहारा  जंगलातील रेल्वे रुळाच्या बाजूला वनविकास महामंडळाच्या जंगलात  तलाव आहे, त्या तलावावर सुट्टीच्या दिवशी अनेक लोक चार चाकी वाहन घेऊन सरळ तलावावर गाड्या लावतात,सह परिवारासह येऊन जेवणाचा बेत अगदी  बिनधास्त पणे करतात , गाड्यांमधले म्युसिक सिस्टिम लावून धिंगाणा घालणे, स्टंट करणे, असा सगळं वन्यजीवांना त्रास देण्याचा प्रकार नेहमीच सुरु असतो, पण ह्या वेळीस चक्क १०-१२ जणांनी स्पिकर्स, माइक घेऊन लोहार जंगलातील तलावावर आर्केस्ट्रा भरवला होता,प्रत्येक रविवारी काही तरी वेगळा उपक्रम ह्या तलावावर होत असतो, नेहमी प्रमाणे हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटी च्या सदस्यांनी वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना फोन वरून तलावावर च्या गोधळ संधर्भात माहिती देण्यात आली व अधिकारी घटनास्थळी आले सुद्धा,पण कुठलीही कारवाई न करता,तंबी देऊन सोडून देण्यात येते, मग पुढच्या रविवारी असाच प्रकार घडतो, पुन्हा वन्यप्रेमी कडून तलावावर होत असलेल्या गोधळ सांगण्यात येतो, अधिकारी कधी येतात कधी-कधी येत सुद्धा नाही, लोक कचरा करतात, दारूच्या बाटला सर्वत्र पसरलेल्या आहे जंगलात अनेक लोक मद्य पिऊन दंगा घालतात, वनविकास महामंडळाचे अधिकारी मनुष्य बळ कमी असल्याने  हतबल  असल्याचे दिसून येते, लोहारा - जुनोना   हा  रास्ता  गावकऱ्यांसाठी  जाण्या  येण्यासाठी असल्याने गेट बसवता येत नसल्याचे वनविकास मंडळाचे सांगतात, स्थानिक वन्यजीव संस्थे सोबत मिळून ठोस पाऊल उचलण्याची अत्यंत गरज आहे, नाहीतर असेच वन्यजीवांना त्रास देण्याचे प्रकार घडतच राहतील,संपूर्ण पणे नियमांचं उल्लंघन होत असतांना, वनविकास महामंडळाचे अधिकारी काही उपाय योजना करतील अशी अपेक्षा आहे, निदान तलावावर गाड्या जाण्यावर निर्बंध घालण्यात येऊन , तलावावर जाण्याचे रस्ते बंद करण्यात यावे, संध्याकाळी ६ नंतर गावकरी किंवा अत्यंत महत्वाचे काम असणाऱ्या व्यक्तीला जाण्याची परवानगी देण्यात यावी, वन्यजीव संस्थेच्या सदस्यांना घेऊन गस्ती करण्यात याव्या अश्या सूचना हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटी च्या वतीने सुचविण्यात आल्या आहे.

नेहमीच वाघ, बिबट, अस्वलीचे वास्तव्य असल्याने लोकांची गर्दी बरेचदा होत असल्याचे दिसत आहे, वनविकास महामंडळ व स्थानिक साथ मिळून काम करण्याची गरज अत्यंत गरज आहे. वन्यजीव पाणी पिण्याकरिता तलावावर येत असतांना लोकांचा गोंगाट पाहून अनेकदा वन्यप्राणी पाणी न पिता निघून जातात, वन्यजीवांना खूप संघर्ष करावा लागत असल्याचे अनेकदा ह्या क्षेत्रात दिसून येते. वनविकास मंडळांनी लवकरात लवकर उपाय योजना करून त्वरित हा प्रश्न सोडण्याची विनंती हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटी च्या वतीने करण्यात आली आहे


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.