चंद्रपूर जिल्हा कारागृहात बंदीजंनासाठी त्वचा रोग तपासणी शिबीराचे आयोजन
चंद्रपूर : जिल्हा कारागृह चंद्रपूर येथे समता फाऊंडॆशन , चंद्रपूर तसेच जिल्हा सामान्य रुग्नालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंदीजंनासाठी त्वचा रोग तपासणी शीबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कारागृह अधिक्षक वैभव आगे, तर प्रमुख अतिथी म्हणून त्वचा रोग तज्ञ डॉ. मनोज उरकुंडे, समता फाऊंडेशन चे सदस्य विवेक झोडे, कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी वैभव आत्राम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थित अतिथींचे कारागृहाच्या वतीने स्वागत करण्यात आले.त्यानंतर उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी यांच्या चमूने कारागृहातील बंदीजन तसेच कारागृह कर्मचारी त्वचा रोगाची तपासणी करुन औषधोपचार केले. कारागृहातील १३० बंदी बांधव तसेच भगिनींनी त्वचा रोग तपासणी शिबिराचा लाभ घेतला. कारागृहाच्या वतीने अधीक्षक वैभव आगे यांनी कोविड-१९ सारख्या संसर्गजन्य आजाराचे काळातही समता फाऊंडॆशन, मुंबई व जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर या संस्थांनी कारागृहात प्रत्यक्ष येवून बंदी बांधवांना आरोग्य सेवा पुरविली त्यांचे या उपक्रमाबद्द्ल आभार व कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुरुंगाधिकारी नागनाथ खैरे,सुनिल वानखडे, तुरुंग शिक्षक ललित मुंडॆ सुभेदार शिवराम चवळे, सीताराम सुरकार, रक्षक गौरव पाचडे यांनी परिश्रम घेतले.