आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट
मतदार संघातील विविध विषयांर चर्चा
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चंद्रपूर दौ-यावर असतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांची ताडोबा येथील एम.टी डी.सी विश्राम गृह येथे भेट घेत मतदार संघातील विविध विषयांवर सकारत्मक चर्चा केली. यावेळी मनपा गट नेते डॉ. सुरेश महाकुलकर, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, प्रा. सुर्यकांत खनके, अजय जयस्वाल, अशोक मत्ते व कलाकार मल्लारप यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे तिन दिवसीय चंद्रपूर दौ-यावर होते. यावेळी त्यांनी ताडोबा भ्रमंतीही केली. दरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांनी ताडोबा येथे त्यांची भेट घेत मतदार संघातील विविध विषयांवर महत्वपूर्ण चर्चा केली. आ. जोरगेवार यांनी या आधीच राज्यपाल यांना चंद्रपूर जिल्हातील नागरिकांना २०० युनिट विज मोफत देण्यात यावी याबाबत पत्र दिले होते. त्या संदर्भात आजच्या भेटी दरम्याण पून्हा एकदा राज्यपाल यांच्याशी आ. जोरगेवार यांनी चर्चा केली. यावेळी आ. जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्हा हा विज उत्पादक जिल्हा असून महाराष्ट्राच्या गरजेपेक्षा ३० टक्के विज येथे तयार होत असल्याचे सांगीतले तसेच या विज केंद्रामुळे आरोग्यावर होणा-या दुष्परिणाम बाबतही माहिती दिली, तसेच ऐतीहासिक पवित्र दिक्षाभुमीच्या विकासासाठी निधी देण्याबाबतही यावेळी सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थाची अडचण लक्षात घेता गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून चंद्रपूर येथे स्थलांतरीत करण्यात यावे, मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी शहरासभोवताल संरक्षण कुंपण बांधण्यात यावे इत्यादी विषयांवर या भेटी दरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.