अंधश्रद्धा असू नये, परंतु जी श्रद्धा आहे त्यावर भावपूर्ण डोळसपणाने विश्वास ठेवा. मार्ग मोकळा होतो असे महान संतांचे कार्य आहे, असे भावपूर्ण शब्दात उद्गार आज अनसूया माता मंदिर जिर्णोद्धाराच्या उद्घाटनप्रसंगी खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले.
गृहमंत्री मा. ना. अनिल देशमुख यांनी मातेच्या सीडीचे विमोचन करताना आईचा आशीर्वाद मला मिळाला आहे आणि तो समाजसेवेसाठी सतत प्रेरणा देणारा आहे असे मनोगत मा. ना. अनिल देशमुख (गृहमंत्री) यांनी व्यक्त केले. मा. आमदार राजू जैन, दीनानाथ पडोळे, अनिल अहिरकर, नगरसेवक दिनेश्वर पेठे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक दिलीप पनकुले यांनी केले व आईच्या संपूर्ण ग्रंथगाथेचा इतिहास संक्षिप्त रूपात त्यांनी सादर केला. याप्रसंगी देविदास अडांगळे, प्रभाकरराव देशमुख, महेश बंग, संजय चोपडे, पराग नामपल्लीवार यांचे स्वागत केले. जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. सुचिता ठाकरे सरपंच, सौ. इंद्रायणी काळबांडे, नगरसेवक राहुल पांडे व लकी कोटगुले यांनी आपली सेवा रुजू केली.
सकाळी पालखी सोहळा, दुपारी विविध भजने सादर करण्यात आली आणि संध्याकाळी मा. प्रफुल पटेल व अनिल देशमुख, गृहमंत्री यांच्या हस्ते महाआरती व प्रसाद वितरण करण्यात आले. याप्रसंगी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. पनकुले परिवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम केले. याप्रसंगी पत्रकार बंधु व इलेक्ट्रॉनिक मिडीया प्रामुख्याने उपस्थित होते.