ओळख कर्तृत्वाची - 11
कर्मवीर मा.सा.उपाख्य दादासाहेब कन्नमवार
!! 11 !!
वर्ध्याला सुतीकागृहात, कन्नमवारांची मुलगी सौ.कमल हिचा एकाएकी मृत्यू झाला.त्यापूर्वी प्रकृती चिंताजनक असल्याची तार त्यानां नागपूरास मिळाली.पण त्याच दिवशी नगर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी दीनदयाल गुप्ता व वामनराव गावंडे यांना अटक झाल्यामुळे सायंकाळी कन्नमवारांना, ते वैयक्तिक सत्याग्रहाचे नागपूर प्रदेशीय संचालक असल्यामुळे, जाहीर सभेत उपस्थित राहणे आवश्यक होते.त्यावेळी त्यांची द्विधा मनःस्थिती झाली. ' कन्या की कर्तव्य'! परंतू कर्तव्यालाच जास्त महत्व देऊन त्यांनी सभेला हजर राहण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी नागपूरच्या जाहीर सभेत बोलत असतांनाच तिकडे वर्ध्याच्या स्मशानभूमीवर त्यांच्या मुलीचा अंत्यसंस्कार चाललेला होता.
अशीच एक घटना ते 1942 ते 1945 मध्ये जेलयात्रा करीत असताना घडून आली. ताई कन्नमवार फार आजारी असल्याची त्यांना जबलपुर तुरुंगात आली. तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी पॉरोल वर घरी जाण्याची विनंती केली. कन्नमवारांनी पॉरोल वर जाण्याच साफ नकार दिला आणि ईश्वराच्या मनात असेल ते होईल, असे म्हणून निश्चिंत राहिले. वरील दोन्ही उदाहरणावरून असे लक्षात येते की, ते द्रुढ निश्चयी होते आणि त्यांनी आयुष्यात कर्तव्याला अगक्रम व श्रेष्ट स्थान दिले होते.
खिमेश मारोतराव बढिये
प्रचारक (नागपूर)
दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती नागपूर
8888422662, 9423640394