📌क्रिडामंत्री सुनील केदार यांचे आवाहन
📌विधानभवनात कन्नमवार जयंती उत्साहात साजरी
नागपूर - बहुजन नायक, स्वातंत्र्य संग्राम सैनिक व माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या विचारकार्याची ज्योत राज्यभर प्रज्वलित करा, असे आवाहन क्रिडामंत्री सुनील केदार यांनी केले. दादासाहेब कन्नमवार यांची १२१ वी जयंती नागपूर विधानभवन प्रांगणात रविवारी (ता. १०) उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
बेलदार समाज संघर्ष समिती व कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार प्रसार समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रकाश गजभिये उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा मंत्री सुनील केदार, प्रवीण कुंटे, राहूल कन्नमवार, डॉ मनोहर मुद्देशवार, सुभाष बोर्डेकर, लक्ष्मी सावरकर, विधानसभा कक्ष अधिकारी कैलास पाजणारे, प्राचार्य गजानन पाटील, रंजना पवार उपस्थित होते. भटक्या विमुक्तांच्या व बेलदार समाजाच्या विविध प्रश्नासाठी लवकरच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन प्रलंबित विषय सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन क्रिडामंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे व कन्नमवार प्रेमींच्या उपस्थितीत विधानभवन प्रांगणात असलेल्या दादासाहेब कन्नमवार यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन आले. या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कन्नमवार दिनदर्शिका २०२१ चे व दादासाहेब कन्नमवार तैलचित्राचे विमोचन करण्यात आले. कन्नमवारांच्या विचारधारेला सोबत घेऊन चालणा-या विविध क्षेत्रातील पाच समाजव्रतींचा सत्कार करण्यात आला. यात दादासाहेब कन्नमवार यांच्यावरील लिखाण कार्यासाठी सौ प्रभाताई वासाडे यांचा कला गौरव, दिव्यांग क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल श्री दिनेश गेटमे यांचा दिव्यांग गौरव, चांपा येथे विकासाची गंगा निर्माण करणारे सरपंच आतिश पवार यांचा समाजकारण गौरव, दादासाहेब कन्नमवार यांचे २००८ पासून प्रचार प्रसार करणारे राजेंद्र बढिये यांचा समाज गौरव तर वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडून आवाज बुलंद करणारे पत्रकार राकेश भिलकर यांचा पत्रकारिता गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कन्नमवार यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन अमन ब्लड बॅकच्या सहयोगाने करण्यात आले होते. यात डॉ रोहित माडेवार, रविंद्र बंडीवार, खिमेश बढिये, धिरज भिसीकर, प्रवीण पौनीकर यांनी रक्तदान करुन शासनाच्या रक्तदान चळवळीच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खिमेश बढिये यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद अडेवार यांनी तर आभार प्राचार्य प्रदिप बिबटे यांनी मानले.
बेलदार समाज संघर्ष समिती व कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार प्रसार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात दिनानाथ वाघमारे, मिलिंद वानखेडे, मुख्याध्यापक प्रकाश भोयर, प्रेमचंद राठोड, विनोद आकुलवार, अण्णा गुंडलवार, विनायक सुर्यवंशी, मनीष गेटमे, बंटी दौलतकर, राजेश मलीये, जगदीश पटले, नामा जाधव, शेषराव खार्डे, कविता बढिये, रजनी बढिये, वर्षा गेटमे, सविता गेटमे, पुष्पा बढिये,
डॉ रोहित माडेवार, प्रदिप बावने, मनीषा बढिये, अरविंद बोमरतवार, नंदा पुंजरवार, प्रमोद काळबांडे, अनील पवार, रतन इंगेवार, रमेश गट्टेवार, बबलू श्रीगिरीवार, संतोष कार्लेवार, तुषार रागिनवार, अनील पुप्पलवार, किशोर सायगन, प्रवीण पौनीकर, धीरज भिसीकर, प्रकाश अडेवार, प्रकाश कांचनवार, स्वाती अडेवार, रामाजी जाेगराना, शंकर पुंड, नरेंद्र तालेवार यांच्यासह कन्नमवार प्रेमी, भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.