गेवरा बुज. येथील जाणीव रुग्णालयाचे उदघाटन
निफन्द्रा/प्रतिनिधी
तालुक्यातील गेवरा बुज येथे सोबत फाउंडेशन चंद्रपूर नीतीपुर्ण संघर्ष समतेसाठी संलग्नित जाणीव रुग्णालयांचे उदघाटन सोबतचे अध्यक्ष डॉ. सुरज म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली उदघाटन गावातील जेष्ठ नागरिक सखुबाई श्रीरामे व श्रीधर दांडेकर यांच्या हस्ते पार पडले.
गेवरा परिसरातील वैद्यकीय अडचण लक्षात घेऊन एमबीबीएस झालेले व स्थानिक युवकांच्या पुढाकाराने सोबत फाउंडेशन उभा राहिला व या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक उपक्रम म्हणून जाणीव रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली, या रुग्णालयात प्राथमिक उपचार कसा होईल याकडे भर देण्यात येणार आहे, ही संस्था रुग्णालयापुरता मर्यादित राहणार नसून विविध उपक्रमावर काम करणार असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरज म्हस्के यांनी केले.
ही संस्था कुणाची एकाची मालकी नसून ही सर्वांची असावी व सर्वांच्या सहकार्याने पुढे जावी असेही यावेळी बोलताना सांगितले, यावेळी कार्यक्रमाला सरपंच सुषमा मुंघाटे, तिलक वाढणकर उपसरपंच, शहीद रुग्णालय दल्ली राजहरा (छत्तीसगड )येथील आरोग्य सेविका कुलेश्वरी सोनवानी, आरोग्य सेवक पुनाराम कोठारी, आरोग्य सेविका सुलेखा, आरोग्य सेविका रेखा, डॉ. पांडुरंग गिरी, रामटेके पो. पा. डॉ. रोहित गणोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात थोरमहात्म्याच्या प्रतिमेला मालार्पण करून द्विपप्रज्वलित करण्यात आले व मान्यवरांचे स्वागत ग्रामगीता देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. रिना दाजगाये, प्रास्ताविक संस्थेचे सचिव पुनम झाडे यांनी तर आभार गुरुदेव शेंडे यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उषा चौधरी,अमिताभ पावडे, सतीश गिरसावळे, डॉ. हर्षा नन्नावरे, रश्मी म्हस्के-सायरे, डॉ. सौरभ धोपटे, मनिषा धुळसे, हंसराज रामटेके, थोमेश्वर कोटरंगे, मिथुन बाबनवाडे, राजु धोटे, मयूर बारापात्रे, विवेक राऊत, अविनाश बारापात्रे, वर्षा भांडेकर, प्रणित ठाकरे, अभिनंदन घरत, महेश चौधरी, भूषण वाकडे, डॉ. अमित ढगे, डॉ. पराग राऊत, डॉ. विठ्ठल साळवे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अजय भांडेकर, आरोग्य सेविका अश्विनी मोहुर्ले यांनी अथक परिश्रम घेतले. आशा, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, सरपंच, माजी सरपंच तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.