Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी ०४, २०२१

सावित्रीबाई फुले यांच्या समाजकार्याचा वसा महिलांनी पुढे चालवावा - सरपंच अनिरुद्ध शहारे aniruddh shahare


नवेगावबांध येथे विविध उपक्रम



संजीव बडोले/ प्रतिनिधी
सामाजिक रूढी परंपरेने गुलामी लादलेल्या तमाम महिलांना शिक्षणाची संधी देऊन सर्वांगीण विकासाची दारे सावित्रीबाई फुले यांनी उघडले.ह्या सामाजिक क्रांतीची संधी साधून, या आधुनिक काळात स्पर्धेच्या जगात महिलांनी शिक्षणाबरोबरच शहाणपणा अंगीकारला पाहिजे. सावित्रीबाई चा वसा महिलांनी पुढे चालवावा. असे आवाहन नवेगाव बांध ग्रामपंचायतचे सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 189 वी जयंती परिसरात विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरी करण्यात आली. येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये राठी लेआउट मध्ये प्रभागातील महिलांनी प्रभाग स्वच्छता कार्यक्रम राबविला. येथील स्थानिक ग्रामपंचायत मध्ये सविधान ग्रामसंघ व सत्यम ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम दिनांक 1 जानेवारी रोज रविवार ला दुपारी एक वाजता संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम संघाचे अध्यक्ष भिमाबाई शहारे ह्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सरपंच अनिरुद्ध शहारे, ग्रामपंचायत सदस्य शितल राऊत, लिलाबाई सांगोलकर, सत्यम ग्राम संघाचे अध्यक्ष सुनिता डोंगरवार, फरिदा तिरपुडे,खिनंदा टेंभेकर, संजीव बडोले, सतीश कोसरकर, बकुबाई सहारे हे होते.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करुन व पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शामकला औरासे व प्रतिमा राऊत यांनी केले. तर उपस्थितांचे आभार माया भैसारे यांनी मानले. येथील प्रशिक बुद्धविहारात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नगर बौद्ध समाजाचे उपाध्यक्ष सरगम सहारे, भास्कर बडोले, समता सैनिक दलाचे हेमचंद लाडे उपस्थित होते
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व शैर्य दिना निमित्त वार्ड क्रं १ ( क्रांती वार्ड) मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात अध्यक्षस्थानी लता जिभकाटे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून रेखा हरिनखेडे, मैथीली चौकसे, हेमचंद लाडे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात कु. स्विटी व सोनु बन्सोड यांनी शौर्य गित गावुन केले. तर कु. वंशीता कौरेथी, स्विटी खोब्रागडे, चि.श्रेयस, श्रीमती रेखा शहारे, वनश्री जांभुळे, सुनंदा ताई किरसान, यांनी सावित्रीमाई यांच्या जिवनावर भाषण दिले. बन्सोड सर यांनी शौर्य दिनाबद्ल माहिती दिली. तर श्रीमती सुप्रिया डोंगरे व राजूभाऊ जिभकाटे, खिंनदाताई टेंभेकर, फरिदा तिरपुडे, यांनी गित गायीले. क्रार्यक्रमाचे संचालन सपना बन्सोड यांनी केले.क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जिवनकार्यावर स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. ६ वी ते पी.जी. पर्यंत च्या पहिल्या गटातून कु. स्विटी खोब्रागडे प्रथम, द्वितीय कु. वंशीता कौरेथी व तृतीय कु.प्राजक्ता जिभकाटे यांनी क्रमांक पटकावला, तर कानवेन्ट ते ५ वी पर्यंत दुसऱ्या गटातून प्रथम निधीस चाचेरे, क्षेयस येल्ले, मृनाली टेंभुने द्वितीय यश भैसारे व तृतीय टिटेश भैसारे यांनी पटकाविले.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त वार्ड क्रं. १ मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात सपना बन्सोड , सुप्रिया डोंगरे, वैदय , मनिषा लाडे, चाचेरे, किरसान , जिभकाटे, अश्विनी ठाकरे, फरिदा तिरपुडे, शोभा येरने, कंरजेकरबाई, करिश्मा कांबळे व वार्डातील सर्व महिलांनी सहभाग घेतला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.