कोविंड 19 अंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये काम केलेल्या आरोग्य सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोना संपे पर्यंत पूर्वपदावर घेण्यात यावे तसेच भविष्यात महानगरपालिकेच् या आरोग्य विभागाच्या सेवेत सदर कर्मचाऱ्यांना समावून घेण्यात यावे.
चंद्रपूर (दिनांक ०८ जानेवारी २०२१)
कोरोनाच्या काळात आरोग्य सेवा म्हणून काम केलेल्या २३ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोना संपेपर्यंत त्यांना पूर्वपदावर घेण्यात यावे या मागणीसाठी मनपातील विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेस गटनेते डॉ.सुरेश महाकुलकर व विदर्भ किसान मजदूर काँग्रेस शहराध्यक्ष तथा मनपा नगरसेवक श्री देवेंद्र बेले, नगरसेवक श्री अशोक नागपुरे यांच्या नेतृत्वात कंत्राटी कर्मचारी यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय राजेश मोहिते यांना निवेदन दिले या निवेदनात असे म्हटले की देशासहित संपूर्ण जगात जेव्हा भयानक covid-19* विषाणूच्या प्रभावाने उद्भवणाऱ्या कोरोना महामारी ने कहर माजवला होता आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी काम करण्यास असमर्थता दर्शविली होती अशा बिकट परिस्थिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बी. एस. सी नर्सिंग, जी. एन. एम. ए.एन.एम, लॅब टेक्निशियन इत्यादी पदावर काम केले आहे* *कोरोनासारख्या अत्यंत घातक परिस्थिती कोरुना युद्ध म्हणून काम केले आहे* आता कोरोना महामारीचा कहर कमी व्हायला लागला परंतु अजूनही करणाची स्थिती संपलेली नाही परंतु उपरोक्त संदर्भीय पत्राने अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिनांक ५ जानेवारी २०२१ पासून सेवा मुक्त करण्यात आले आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबाला घेऊन भयानक परिस्थितीत सेवा दिली आहे. तसेच आता त्यांना तात्काळ इतरत्र सेवा उपलब्ध होणे शक्य नाही. बाहेरगावचे असल्याने सध्या चंद्रपूर मध्ये किरायने राहत आहे. व व त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आहे कोरोना पूर्णपणे नष्ट होईपर्यंत या २३ कंत्राटी आरोग्य सेवकांना पूर्वव्रत सुरू ठेवाव्यात तसेच भविष्यात आपल्या महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सेवेत यथावकाश त्यांना प्राधान्य द्यावे. अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकानी केली आहे,