ओळख कर्तृत्वाची - भाग 9
कर्मवीर मा.सा.उपाख्य दादासाहेब कन्नमवार
राजकीय जीवनाची व कार्याची सुरुवात
दादासाहेब कन्नमवार इंग्रजी 6 व्या इयत्तेत असताना लोकमान्य टिळक होमरूल दौऱ्यानिमित्त 15 फेब्रु 1918 ला चंद्रपुर आले होते. लोकमान्य टिळकांचे देशभक्तीने ओथंबलेले भाषण ऐकून त्या भाषणाचा कन्नमवारावर इतका प्रभाव पडला की कन्नमवारांनी त्यादिवसापासून देशसेवेची दीक्षा घेतली. तसेच त्यांची शाळेतील पुढाकाराची भूमिका बगता अगदी लहानपणापासून स्वयंसिद्ध नेेतेपणा व संघटक कौशल्याचे बीज त्यांच्या अंगी रुजलेले आढळते .
कन्नमवार अलाहाबाद यूनिवर्सिटीत मँट्रीक परिक्षेला बसले गणित कच्चा असल्याने नापास झाले. कलकत्ता यूनिवर्सिटीत गणित विषय सोपा असल्याचे कळल्याने त्यांनी कलकत्ताला शिकवयास जाण्याचे ठरविले.कलकत्यास जावयास निघाल्यावर वर्धा स्टेशनवर टिळकांची निधनाची बातमी* कळली, डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या, त्यांना वाटायला लागले की, किती दुर्दैवी! इकडे लोकमान्य टिळकांचे निधन व्हावे आणि मी गुलामगिरीचे शिक्षण घेण्याकरिता कलकत्यास जावे.असे कितीतरी विचार त्यांच्या मनात येत होता आणि या विचारात ते कलकत्याला पोहचले .
पण त्यांचं मन रमेना शेवटी आता मँट्रीकची परिक्षा देण्यात काही अर्थ नाही, आयुष्यात स्वतंत्र राहून देशसेवा करावी असे त्यांनी ठरवून टाकले आणि अभ्यासाला पूर्णविराम दिला, हीच त्यांच्या राजकीय जीवनाची व कार्याची सुरुवात.
खिमेश मारोतराव बढिये
प्रचारक (नागपूर)
दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती नागपूर
8888422662, 9423640394