खासदार शरद पवार ह्यांना निमंत्रण : दिलीप पनकुले
देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी माँ वैष्णवी शिक्षण संस्थेच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्व. राजीव गांधी यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणाला येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दिलीप पनकुले यांनी आज मुंबईत सिल्वर ओक येथील त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीतील चर्चेत निमंत्रण देण्यात आले.
शरद पवार यांच्या नियोजित नागपूर दौऱ्यात या कार्यक्रमाला मंजुरी दिली असून लवकरच या बाबतचा दौरा ते जाहीर करणार आहेत असा शब्द मा. खासदार शरद पवार यांनी संस्थेचे अध्यक्ष दिलीप पनकुले यांना दिला.
ह्या निमंत्रणाबाबत मा. खासदार प्रफुल पटेल आणि गृहमंत्री मा. ना. अनिल देशमुख ह्यांच्यामार्फत ही शिफारस करण्यात आल्याचे दिलीप पनकुले यांनी स्पष्ट केले.
माँ वैष्णवी शिक्षण संस्थेत मा. शरद पवार साहेब हे सन २००६ साली नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी आले ते होते, हे विशेष !