Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी १३, २०२१

महात्मा फुले समता परिषद व कर्मवीर महाविद्यालय मूल च्या संयुक्त विद्यमाने मूल भव्य रक्तदान शिबिर

महात्मा फुले समता परिषद व कर्मवीर महाविद्यालय मूल च्या संयुक्त विद्यमाने मूल भव्य रक्तदान शिबिर

27 रक्तदात्यांनी केले रक्तदान

मूल - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चंद्रपूर(पूर्व) व कर्मवीर महाविद्यालय मूल यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती सप्ताह व कर्मवीर मा.सा. कन्नमवार जयंती निमित्त कर्मवीर महाविद्यालय मूल येथे आज दिनांक 10 जानेवारी 2021 रोज रविवारला सकाळी 10:30 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.हे शिबीर समता परिषद चंद्रपूर (पूर्व ) चे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले यांच्या नेतृत्वात घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळ मूल चे अध्यक्ष बाबासाहेब वासाडे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून समता परिषद चंद्रपूर(पूर्व )चे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले , प्राचार्य डॉ. के.एच.कऱ्हाडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाधर कुनघाडकर, प्राचार्य खडतकर, शासकीय रक्तपेढी चंद्रपूर चे डॉ.उत्तम सावंत,डॉ.गुणवंत जाधव आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.प्रास्ताविक प्राचार्य डॉ. के.एच.कऱ्हाडे यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून रक्तदानाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एडव्होकेट बाबासाहेब वासाडे यांनी कर्मवीर मा. सा. कन्नमवार व माजी खासदार स्वर्गीय वि.तू.नागपुरे यांचे स्मरण करून त्यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला. सध्या कोरोनाच्या संक्रमानामुळे शासनाकडे रक्तसाठा अपुरा असल्यामुळे रुग्णांना रक्तपुरवठा करणे ही युवावर्ग व नागरिकांची नागरीकांची जबाबदारी आहे. त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान समजून युवकांनी पुढे यावे असे आवाहन प्रा.विजय लोनबले यांनी केले. रक्तदान शिबिरात 27 रक्तदात्यांनी रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान संकलनाचे कार्य शासकीय रक्तपेढी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरचे डॉ.उत्तम सावंत,डॉ.गुणवंत जाधव,डॉ.दिनेश बांगर,डॉ.शुभांगी अगडे, लक्ष्मण नगराळे यांच्या चमूने केले.
कार्यक्रमाचे संचालन समीर अल्लूरवार यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रा.सिकंदर लेनगुरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समता परिषदेच्या जिल्हा महिला कार्याध्यक्षा शशिकला गावतुरे , समता परिषदेचे सल्लागार युवराज चावरे, जिल्हा सहसंघटक ईश्वर लोनबले,देवराव ढवस,पुरुषोत्तम कुनघाडकर,सीमा लोनबले ,विक्रांत मोहूर्ले, दुष्यंत महाडोळे,कर्मवीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व एन.सी.सी.युनिटचे प्रमुख व विध्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.