'बर्ड फ्ल्यू' प्रादुर्भावासंबंधी सतर्कता
बाळगण्याचे आवाहन
मूल : देशातील राजस्थान, मध्यप्रदेश आणि
हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये कावळे, वन्यपक्षी व स्थलांतरीत
पक्षी यांच्यामध्ये एव्हिएन एन्फ्ल्युएंझा (बर्ड फ्ल्यु) या रोगाचा
प्रादुर्भाव दिसुन आला आहे. या अनुषंगाने वन विभागाच्या
अखत्यारितील पाणसाठा, तलाव व इतर ठिकाणी वन्य पक्षी
किंवा स्थलांतरीत पक्षी यांच्यामध्ये असाधारण मृत्यु आढळल्यास
तसेच ग्राम पंचायत कार्यक्षेत्रामध्ये असाधारण मृत्यु
आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ नजिकच्या
पशुधन अधिकारी किंवा पशुवैद्यकीय चिकीत्सालयाशी संपर्क
साधावा.
या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक
कार्यवाहीची तसेच पोल्ट्री फार्म साठी जैवसुरक्षाबाबत मार्गदर्शक
सुचनांची माहिती www.dahd.nic.in या संकेतस्थळावर दिली
आहे. तरी या सूचनांनुसार सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा
पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. भि.डो.राजपुत यांनी केले आहे.