• उत्तम दर्ज्याच्या मेट्रो वाहतूक प्रणालीचा नागरिकांनी उपयोग करावा
नागपूर,०९ डिसेंबर: नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे. तसेच आज पासून २ नवीन मेट्रो स्टेशन शंकर नगर चौक आणि रचना रिंग रोड जंक्शन आज पासून नागरिकांच्या सेवेत सुरु झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज नागपूर पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी आज महा मेट्रोच्या ऑरेंज लाईन मार्गिकेवरील सिताबर्डी इंटरचेंज ते जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोने प्रवास केला. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचा आजचा प्रवास अत्यंत आरामदायक व आनंददायी नागपूरकरांनी याचा वापर करावा मत श्री. कुमार यांनी व्यक्त केले. उत्तम दर्ज्याची सार्वजनिक वाहतूक सेवा नागपूर शहरात उपलब्ध असून, पर्यावरण व इतर सोई सुविधाच्या दृष्टीने नागपूर मेट्रोचा प्रवास नक्कीच उपयुक्त आहे.
महा मेट्रो तर्फे नॉन मेट्रो परिसरात कनेटिव्हिटी वाढवली जात असून ही अतिशय चांगली बाब आहे. नागरिकांनी स्वतःचे वाहन शक्य असेल तेवढे कमी वापरून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. मेट्रोच्या स्वरूपात अत्यंत चांगली सुविधा आज शहरातील नागरिकांना उपलब्ध असून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मेट्रोचा उपयोग करावा असे आवाहन यावेळी पोलीस आयुक्त श्री.अमितेश कुमार यांनी नागरिकांना केले. नागपुरातील जनतेने जास्तीत जास्त संख्येने मेट्रोचा उपयोग करून वाहतुकीच्या समस्येवर मात करण्यासाठी योग्य मार्ग निवडावा असेहि ते म्हणाले.