Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, डिसेंबर २८, २०२०

१३६ वर्षांनंतरही काँग्रेस जनाजनात आणि मनामनात : खासदार बाळू धानोरकर



काँग्रेस कमिटीतर्फे स्थापना दिवसाचा कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूर : स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्यायप्रियतेला केंद्रस्थानी ठेवूनच काँग्रेसने सदैव वाटचाल केली. या तत्वनिष्ठ कामाचे फळ म्हणूनच १३६ वर्षांनंतरही काँग्रेस जनाजनात आणि मनामनात आहे, काँग्रेसने आजवर कित्येक संकटे झेलली अनेक आव्हाने स्वीकारली. काँग्रेसने नेहमी जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष केला, काँग्रेस स्थापना दिनाच्या शुभेच्छा अशी प्रतिपदन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते स्थानिक गिरनार चौक काँग्रेसच्या संघर्षमय प्रवासाला आज १३६ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्य काँग्रेस कमिटीतर्फे स्थापना दिवसाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री विजय वड्डेटीवर, माजी आमदार देवराव भांडेकर, चंद्रपूर शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, काँग्रेस जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, काँग्रेस नेते सुभाष गौर, प्रदेश महिला सरचिटणीस नम्रता ठेमसकर, जिल्हा महिला अध्यक्ष चित्राताई डांगे, शहर महिला अध्यक्ष सुनीता अग्रवाल, नगरसेवक अमजद अली, नगरसेविका सुनीता लोढीया, नगरसेविका संगीता भोयर, नगरसेवक नंदू नगरकर, जिल्हा अल्पसंख्याक कमिटी अध्यक्ष सोहेल रझा, काँग्रेस नेते प्रवीण पडवेकर, उत्तम ठाकरे, कुणाल चहारे, अश्विनी खोब्रागडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, काँग्रेसच्या संघर्षमय प्रवासाला आज १३६ वर्षे पूर्ण झाली. काँग्रेस त्याच जिद्दीने समाजातील प्रत्येक घटकासाठी संघर्ष करत आहे. शेतकरी, सामान्य माणूस, तरुण यांच्यासाठी विकास व संघर्ष हीच काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे.सर्वसमावेशक वृत्तीने देशहिताचा ध्यास घेणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा, स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करणारा आणि सामान्य माणसाच्या मागे भक्कमपणे उभा राहणारा हा पक्ष जना-मनात वसला आहे. असे विचार त्यांनी मांडले.  
पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी आपल्या मनोगतात म्हणाले कि,  काँग्रेसच्या संघर्षमय प्रवासाला आज १३६ वर्षे पूर्ण झाली. काँग्रेस त्याच जिद्दीने समाजातील प्रत्येक घटकासाठी संघर्ष करत आहे. शेतकरी, सामान्य माणूस, तरुण यांच्यासाठी विकास व संघर्ष हीच काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे. काँग्रेसच्या संघर्षमय प्रवासाला आज १३६ वर्षे पूर्ण झाली. आजही देशाला इंग्रज राजवटीसारख्या आव्हानांचा सामना करावा लागतोय. मात्र काँग्रेस त्याच जिद्दीने आणि जोशाने राज्यघटनेच्या, लोकशाहीच्या आणि भारतमातेच्या आत्म्याचे रक्षण करते आहे आणि पुढेही करत राहील. असे त्यांनी म्हंटले. 
यावेळी सेल्फी विथ तिरंगा व फुगे आकाशात सोडून त्याच प्रमाणे केक कापून या ऐतिहासिक दिवसाचे स्वागत करण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.