Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, डिसेंबर २८, २०२०

देशातील प्रख्यात सेक्स एक्स्पर्टने घेतला जगाचा निरोप

हिंद्र वत्स यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९६ वर्षांचे होते. टाइम्स समूहाच्या 'मुंबई मिरर' या दैनिकातील 'आस्क द सेक्सपर्ट' या स्तंभामुळं त्यांना एक वेगळी मिळाली होती. लैंगिक आरोग्यविषयक लेखन व समुपदेशनामुळं वत्स हे अनेकांचे फ्रेंड, फिलॉसॉपर आणि गाइड बनले होते.

Mahinder Watsa
महिंद्र वत्स यांच्या निधनाबद्दल कुटुंबीयांनी काढलेलं निवेदन

लैंगिक विषयावर समुपदेशन करणारा व सल्ला देणारा 'मुंबई मिरर'मधील त्यांचा स्तंभ प्रचंड लोकप्रिय ठरला होता. या स्तंभातून ते लोकांना लैंगिक आरोग्याविषयी उत्तम मार्गदर्शन करायचेच, पण खुसखुशीत उत्तरांनी वाचकांचं मनोरंजनही करायचे. वत्स यांनी १९६० मध्ये स्तंभलेखन सुरू केले. फेमिना, फ्लेअर आणि ट्रेंड या महिलाविषयक मासिकांसाठी त्यांना वैद्यकीय सल्ला देणारे लेखन करण्याची संधी मिळाली. त्यानंतर १९७० पर्यंत त्यांनी अनेक मासिकांमध्ये लेखन केले.



वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतानाच भारतात लैंगिक समस्यांबाबत अज्ञान असल्याचे त्यांच्या लक्षात आले. १९७४ मध्ये 'फॅमिली प्लानिंग असोसिएशन ऑफ इंडिया' सोबत सल्लागार म्हणून काम करत असताना त्यांनी देशात लैंगिक शिक्षण कार्यक्रम राबवण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांचा प्रस्ताव स्वीकारला गेला आणि त्यानंतर अनेक स्तरांतून विरोध झाल्यानंतरही देशात पहिले सेक्स एज्युकेशन, समुपदेशन व उपचार केंद्र सुरू करण्यात आले. त्यानंतर १९८० मध्ये वैद्यकीय व्यवसाय थांबवून त्यांनी पूर्णवेळ समुपदेशन व लैंगिक शिक्षणाचे काम सुरू केले.


'मेड इन चायना' या चित्रपटात अभिनेते बोमन इराणी यांनी साकारलेले डॉ. वर्धी हे पात्र डॉ. वत्स यांच्यावरच बेतले होते. चित्रपटात हे पात्र अधिकाधिक उत्तमरित्या उभे करता यावे म्हणून दिग्दर्शक मिखिल मुसळे यांनी वत्स यांच्या अनेकदा भेटी घेतल्या होत्या. त्यांच्याशी चर्चा केली होती. वत्स यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे मुसळे खूपच प्रभावित झाले होते. वत्स हे मला भेटलेल्या अत्यंत अनुभवी व प्रामाणिक व्यक्तींपैकी एक होते, अशी भावना मुसळे यांनी नंतर व्यक्त केली होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.