देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आहे. देवेंद्र फडणवीस वयाच्या 27 व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर झाले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस नागपूरच्या राम नगर वार्डमधून विजयी झाले होते. देवेंद्र फडणवीस राज्याच्या उपराजधानीचे महापौर झाले होते. तर, आर्या राजेंद्रन केरळची राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरमची महापौर होणार आहे. तब्बल 23 वर्षानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरील रेकॉर्ड मोडले जाणार आहे.
आर्या राजेंद्रननं महापौर पदाची शपथ घेतल्यानंतर ती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विक्रम मोडणार आहे.
केरळमध्ये नुकत्याच महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये तिरुवनंतपुरम महापालिकेत मुडवणमुगल वार्डातून आर्या राजेंद्रन ही 21 वर्षीय तरुणी विजयी झाली आहे. ती आता तिरुवनंतपुरम महापालिकेची महापौर होणार आहे. देवेंद्र फडणवीस वयाच्या 27 व्या वर्षी महापौर झाले होते. देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम फडणवीसांच्या नावावर आहे
आर्या राजेंद्रन भारतातील सर्वात तरुण महापौर होणार आहे. ती सध्या ऑल सेंटस कॉलेजमध्ये बीएस्सी मॅथ्सचे शिक्षण घेत आहे. आर्या राजेंद्रन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणुकीत विजयी झाली असून ती स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची राज्य कार्यकारिणीची सदस्य देखील आहे.
आर्या राजेंद्रन सीपीएमच्या ब्रँच कमिटी सदस्य असून बालाजनसंघम प्रदेशाची अध्यक्ष आहे. आर्याचे वडील इलेक्ट्रिशीयनचे काम करतात. तर, तिची आई श्रीलथा एलआयसी एजंट म्हणून काम करते. केरळमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांच्या लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रंटने विजय मिळवला आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत एलडीएफ प्रथम क्रमांकावर, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली.