ब्रिटिशांशी संघर्ष करताना छत्रपती चौथे शिवाजी महाराजांना अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झाले. या घटनेने ब्रिटिश सरकार हादरले होते. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तेव्हाच्या अधिकाऱ्यांनी केला. त्याचे पडसाद नंतर इंग्लंडच्या पार्लमेंटमध्येही उमटले. कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांना प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून हवापालटासाठी म्हणून तेव्हाचे दिवाण व ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कोल्हापूरातून अन्यत्र हलवले.
जून १८८२ मध्ये महाराजांना अहमदनगरच्या किल्ल्यात एकांतवासात ठेवण्यात आले. त्यांना कोणाला भेटू दिले जात नव्हते. शेवटचे दीड वर्ष महाराज किल्ल्यात होते. २५ डिसेंबर १८८३ रोजी ब्रिटीश सार्जंट ग्रीन याच्याशी झालेल्या झटापटीत महाराजांच्या पोटाला मार लागून मृत्यू झाला.
आजही अहमदनगर येथील महाराजांच्या दहनभूमीवर एक छोटी समाधी व महाराजांचे सुंदर स्मारक उभे आहे!
महाराजांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन !