Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर ०७, २०२०

फिल्ट्रेशन प्लॅंटची पाणीवहन नलिकेची पडदी कोसळली




जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर नगरपालिकेची सन २०११ पासुन अर्धवट अवस्थेत असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील
फिल्ट्रेशन प्लॅंटच्या नव्याने पुनरउभारणी व चाचणी सुरू असताना  बांधकामातील जवळपास ८० फूट लांबीची पाणी  वाहुन नेणाऱ्या चॅनेलची दक्षीण  बाजुकडील  छोटी पडदी  कोसळली.     मागील आठ  वर्षापासुन जुन्नरकर नागरीकांना   फिल्टर करलेले शुद्ध पाणी मिळत नव्हते.म्हणुन          नगरपालीकेने    फिल्ट्रेशन प्लॅंटच्या  नव्याने पुनरउभारणी करण्याच्या१कोटी  चाळीस लाख रुपये  खर्चाच्या  कामाची सुरवात पाच महिन्यांपुर्वी केली होती.आज दि(६)रोजी  दुपारी ३ च्या सुमारास, फिल्टरेशन हॅापर मध्ये पाणी सोडून चाचणी सुरू   होती. त्यावेळी पाणी चॅनेलमधुन पाणी  फ्लेक मिक्सर मध्ये जात असताना  पाण्याचा दाब वाढल्याने एका बाजूची जवळपास ८० फूट लांबीची आणि चार फूट उंचीची पडदी कोसळली .पाच महिन्यांपूर्वीच ही पडदी बांधण्यात आली होती.पाण्याचा  दाब जरी  वाढला तरी दाब सहन करण्याची पडदीची क्षमता पाहीजे होती .परंतु पडदी कोसळल्याने  नीकृष्ट  दर्जाचे काम झाले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.२०११ मध्ये ९कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना केंद्र शासनाच्या आर्थिक योगदानातुन सुरू करण्यात आली होती.परंतु लोकप्रतिनिधी व ठेकेदार यांच्या अभद्र युतीने हे काम अर्धवट राहीले. योजनेचा खर्च  वाढला ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली ,नंतर काळ्या यादीत टाकण्यात आले परीणामी जुन्नरकर नागरीकांना अशुद्ध पाणी  पीने नशीबी आले होते.      सद्यस्थितीत सहा पैकी २ हॅापर कार्यान्वित करून शहराला शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने हॅापर दुरूस्ती पाईपलाईन आणि तत्सम कामांसाठी मार्च २०मध्ये १ कोटी ४० लाख रूपये मंजूर होऊन हे काम सुरू करण्यात आले होते.

हा प्रकार पाण्याच्या अतिरिक्त दाबामुळे ..
फिल्टरेशन प्लँट ची चाचणी घेत असताना,१७५ अश्वशक्ती दाबाने पाणी सोडले होते. मात्र पाणीवहन चॅनेल मधुन ते पुढे फ्लेक  मिक्सरमध्ये जाताना ते सहा इंचाच्या दोन पाईपमधून जात होते. त्यामुळे चॅनेलच्या पडदीवर पाण्याचा  दाब वाढल्याने पडदी कोसळली. घडला. तांत्रिक   चुकीने हा प्रकार झाला  आहे. त्याची योग्य ती दुरूस्ती करण्यात येईल व काम पुर्ण केले जाईल. - विवेक देशमुख( बांधकाम विभाग प्रमुख)


(लोकप्रतिनिधी ,ठेकेदार प्रधासन यांची अभद्र युतीने  नगरपालीकेत भ्रष्ट  कारभार सुरु असल्याने  निकृष्ट कामे होत आहेत.फिल्टरेशन प्लँटची चाचणी घेत असताना बांधकाम विभागाचे अधिकारी, मुख्याधिकारी यांनी स्वता उपस्थित राहणे गरजेचे होते. परंतु हे आधिकारी उपस्थित राहीले नाहीत.  - मधुकर काजळे, अध्यक्ष सजग नागरीक  मंच जुन्नर

नवीन कामात असे प्रकार  होणे, हे कामाच्या गुणवत्तेत शंका निर्माण करणारे आहे.यापुढे काम दर्जेदार झाले नाही तर कारवाईसाठी पाठपुरावा करणार -भाऊ कुंभार नगरसेवक राष्ट्रवादी  काँग्रेस


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.