कचेपार येथील घटना आरोपीला अटक
सिंदेवाही. येथून 11 कि. मी. अंतरावर असलेल्या कचेपार येथे घरगुती वादातून पतीने पत्नीला कुÚहाडीचे घाव घालून निर्घृृण हत्या केल्याची हृदयद्रावक घडली. फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की काल दि.15 ला आरोपी सुरेष लक्ष्मण रण्दिवे वय 45 हा सिंदेवाही येथे आठवडी बाजार आटोपून कचेपार येथे परत आला. सकाळी पत्नीसोबत भांडण झालेला होता. घरी गेल्यानंतर त्याने काड्या फोडून दिले. सायंकाळी 5.30 वा. घरात स्वंयपाकाच्या कामात असलेल्या मृतक गीता सुरेष रणदिवे वय 38 हिच्या मानेवर कुÚहाडीने वार केले. गीता जागीच कोसळली. आरडा ओरड मुळे गावातील लोक गोळा झाले. दरम्यान आरोपी सुरेष जंगलात पळाला. पो. नि. महिपाल सिंग चांदा आपला ताफा घेउन घटनास्थळी दाखल झाले परंतु सुरेष पसार झाला होता. सुरेषला तीन मुली आणि एक मुलगा आहे. मोठ्या मुलीचा लग्न झाला असून लहान मुलगी यावर्षी दहावीला होती. आज सकाळी 10 वाजता आरोपी सुरेषला अटक करण्यात आली. हत्येमागील नेमके कारण कळू षकलेले नाही परंतु संषयातून हे हत्याकांड घडल्याची चर्चा आहे.