Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर २०, २०१२

http://www.facebook.com/chandrapur.citybus



शहरामधला प्रवास म्हणजे एक अग्निदिव्यच! या प्रवासात नागरिकांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. परंतु, याला काही पर्याय नसल्याने हा संघर्षमय प्रवास टाळता येत नाही. परंतु, या त्रासातून नागरिकांना सुटका करून घ्यायची असेल, तर सार्वजनिक वाहतूकव्यवस्था निर्माण होण्याची गरज आहे. ती शहर बससेवेच्या माध्यमातून सोडविणे शक्य आहे.
गेल्या काही वर्षांत शहर झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील नागरिकांचे प्रश्नही वाढताहेत. शहरामधल्या वाहतूकव्यवस्थेचा प्रश्नही वाढत्या शहरीकरणाचा परिणाम आहे. ही वाहतूकव्यवस्था सुधारावी, यासाठी अनेक प्रयत्न झालेत. मात्र, या प्रश्नावर समाधानकारक पर्याय महानगरपालिकेने शोधलेला नाही.
दररोज सकाळी जिवाचा आटापिटा करीत घराबाहेर पडणाèया शहरातील नागरिकांसाठी प्रवास म्हणजे तारेवरची कसरत असते. शहरातील नागरिकांना प्रवासासाठी सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. हा प्रवास अत्यंत खर्चिक आणि त्रासदायक झालेला आहे. कारण वाहनांची संख्या वाढत चालल्याने शहरांमधील वाहतुकीची आणि प्रदूषणाची समस्या बिकट झालीय. या प्रवासासाठी पैसे तर जातातच, शिवाय मानसिक आणि शारीरिक त्रासाचा संघर्षमय प्रवास करावा लागतो.
या संघर्षमय प्रवासातून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी शहर बससेवा हा पर्याय होऊ शकतो.
सर्वांत महत्त्वाची नागरी सुविधा अपेक्षित आहे. ती वेगवान, सुरक्षित सार्वजनिक वाहतुकीची. वाहनांची संख्या जितकी मर्यादित राहील, तितकी वाहतुकीची गती अधिक आणि तितके शहर प्रदूषणमुक्त, हे साधे तत्त्व आहे. गाड्यांची संख्या मर्यादित राहण्यासाठी सार्वजनिक वाहतूकव्यवस्थाच उपयोगी ठरते. या यंत्रणेकडे आतापर्यंतच्या सत्ताधाèयांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने खासगी वाहनांची संख्या भरमसाठ वाढली. 
शास्त्रीय निकषांनुसार दर एक लाख लोकसंख्येमागे पंचावन्न बसगाड्या धावल्या पाहिजेत. याचाच अर्थ चंद्रपूर शहरातील साडेतीन लाख लोकसंख्येनुसार दीडशेहून अधिक बसङ्केèयांची गरज आहे.
इंधनाची बचत करण्यासाठी आणि वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. शहरातील रस्ते, वेगाने वाहने दामटण्याची प्रवृत्ती चालकांत वाढीस लागल्याचे आढळते. महामार्गांवर मओव्हरटेकङ्क करण्याची तर स्पर्धाच लागलेली असते. बेदरकार आणि वेगमर्यादा झुगारून वाहने चालविल्यामुळे काही वर्षांत रस्त्यांवरील अपघातांत प्रचंड वाढ झाली आहे.

ङ्कायदा कोणाला?
कार्यालयांत जाणारे कर्मचारी
महाविद्यालयाचे विद्यार्थी
बाहेरून येणारे पर्यटक
शहराबाहेर जाणाèयांना
जवळच्या खेड्यांना

ङ्कायदा कसा?
इंधन वाचेल, पैशांची बचत होईल
शरीराला आराम
देखभाल, पार्किंगची qचता नाही.
प्रदूषणाला आळा बसतो
वेळेची बचत होते
मार्गावरील अपघातांना लगाम
प्रवासातील सुरक्षिततेत वाढ
ऑटोरिक्षांना लगाम

--------------------
अडचणी व उपाय
चंद्रपूर शहरातील वाहतुकीची सर्वांत मोठी अडचण म्हणजे जटपुरा गेट. अनेकांनी अनेक उपाय सुचविलेत. मात्र, तोडगा निघालेला नाही. गेटमध्ये होणाèया कोंडीला मोठ्या वाहनांसह दुचाकीदेखील कारणीभूत आहेत. चारचाकी वाहनांच्या रांगेत दुचाकी आल्यास वाहन बाहेर काढताना गैरसोय होते. शिवाय जागाही व्यापते. ऑटोरिक्षा आणि दुचाकींची संख्या कमी झाल्यास बसगाड्या सहज धावू शकतील.
दुसरी अडचण म्हणजे पार्किंग. शहरातील दोन्ही मार्ग अरुंद आहेत. त्यामुळे बसगाड्यांना थांबे देताना गैरसोय होईल, असा युक्तिवाद आहे. मात्र, बससेवेमुळे दुचाकी आणि ऑटोंची संख्या कमी होऊन पार्किंगची समस्या सुटेल.
-----------------------
बससेवा कुठे असावी?

शहर बससेवेचे टप्पे आणि थांबे
पठाणपुरा गेट ते बसस्थानक
(गांधी चौक, जयंत टॉकीज, जटपुरा गेट, जिल्हा परिषद)

जुनोना चौक ते बसस्थानक
(जुनोना चौक, बायपास, बंगाली कॅम्प, वन कार्यालय)

बसस्थानक ते घुग्घुस
(प्रियदर्शिनी चौक, प्रेस क्लब चौक, जनता कॉलेज, हॉटेल कुंदन प्लाझा, पडोली, नागाळा, एमआयडीसी चौक)

बसस्थानक ते ऊर्जानगर
(तुकूम, शिवाजी चौक, विधी महाविद्यालय, खत्री कॉलेज, कोंडानाला, दुर्गापूर, शक्तिनगर)

ऊर्जानगर ते बल्लारपूर
(शक्तिनगर, दुर्गापूर, तुकूम, बसस्थानक, जटपुरा गेट, गिरनार चौक, अंचलेश्वर गेट, महाकाली मंदिर, बागला चौक, अभियांत्रिकी महाविद्यालय, विसापूर ङ्काटा)

लोहारा ते पडोली
(एमईएल, कृष्णनगर, इंदिरानगर, बंगाली कॅम्प, बसस्थानक, जुना वरोरा नाका, पडोली)
------------------
नवीन बससेवा सुरू करण्याची कार्यपद्धती
नागरिकांसाठी कार्यक्षम प्रवासी वाहतूक सेवा निर्माण करण्याचा मुख्य उद्देश केंद्रीभूत ठेवूनच एसटी महामंडळ कामकाजाची दिशा निश्चित करीत असते. परिणामी रस्ते प्रवासी वाहतुकीसंदर्भात समाजातील विविध घटकांची मागणी, त्यांच्याकडून वेळोवेळी प्राप्त होणारी निवेदने, त्याचप्रमाणे महामंडळाकडे उपलब्ध असलेली माहिती इत्यादीचे शास्त्रीय पद्धतीने संकलन करण्यात येऊन राज्यातील विविध मार्गांवर नवीन बससेवा सुरू करणे qकवा कार्यरत असलेल्या सेवा स्थगित करणे, यासंदर्भात निर्णय घेण्यात येतात. सर्वसाधारणपणे नवीन बससेवा सुरू करण्याबाबत महामंडळाकडे मागणी आल्यास मार्गावर उपलब्ध असलेल्या बससेवा, त्यांना मिळणारा प्रवासी प्रतिसाद, त्या मार्गांवर उपलब्ध असलेली प्रवासी क्षमता, व्यापारी/ औद्योगिक केंद्रे, शैक्षणिक संस्था इत्यादी घटक विचारात घेऊन नवीन बस सुरू करण्याची आवश्यकता पडताळली जाते आणि तद्नंतर नवीन बस सुरू करण्याच्या मागणीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येतो.
नवीन बसगाड्यांची मागणी नागरिकांनी माहे डिसेंबरपूर्वी करणे आवश्यक आहे. तथापि, नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता दरम्यानच्या कालावधीत प्राप्त झालेल्या निवेदनाची दखल महामंडळाकडून तत्काळ घेण्यात येते.
--------------------
शहरातील वाहनांची संख्या
(आकडेवारी मार्च २०११)

मोटारसायकल- ५९ हजार ४७२
स्कूटर- १४ हजार ५६८
मोपेड- १७ हजार ८७९
एकूण- ९१ हजार ९१९
------------------
कार- सहा हजार ४६८
जीप- दोन हजार ३७४
स्टेज व्हॅन- २७
एकूण- आठ हजार ८६९
-----------------
टॅक्सी- ३८२
ऑटो- ४ हजार
-------------
स्टेज कॅरिगेज- ३५८
मालवाहू कॅरिगेज-६२
स्कूल बस- ७९
खासगी वाहन- ३९
एकूण- ५३८
------------------
गुड्स गॅरेज
ट्रक- चार हजार ५३
टँकर- ८४
चारचाकी मालवाहू- एक हजार ३१८
तीन चाकी मालवाहू- ७६९
एकूण-सहा हजार २२४
---------
ट्रॅक्टर- एक हजार ५३७
ट्रेलर- एक हजार ९६४
रुग्णवाहिका- १३८
इतर- १९३
एकूण- ३३१
---------------
शहरातील एकूण वाहने- एक लाख १५ हजार ९१

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.