चंद्रपूर - मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या चंद्रपूरकरांना सोमवारी (ता. 3) मॉन्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला. सायंकाळी शहरात अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी कोसळल्या. नागपूर वेधशाळेने मंगळवारीही पावसाची शक्यता वर्तविली आहे.
केरळमध्ये दाखल झालेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाचा अर्थात मॉन्सूनचा प्रभाव आता महाराष्ट्रात दिसू लागला आहे. नागपूरसह विदर्भात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ढगांची दाटी होऊन रात्री साडेनऊच्या सुमारास शहरात जलधारा कोसळल्या. पावसापासून बचाव करण्यासाठी अनेकांना आडोसा शोधावा लागला. रेनकोट व छत्र्यादेखील बाहेर पडल्या. फुटपाथवर दुकाने थाटणाऱ्यांचीही फजिती झाली. उशिरा रात्रीपर्यंत अधूनमधून सरी सुरूच होत्या. वरुणराजाने चोरपावलांनी अचानक "एंट्री' केल्याने नागरिकांची चांगलीच त्रेधा उडाली. पण, त्याच वेळी आल्हाददायक वातावरणाचा त्यांनी आनंदही घेतला. विशेषत: पहिल्या पावसाने वातावरणात दरवळलेला मातीचा सुगंध मनाला सुखावणारा ठरला. नागपूरकर गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हामुळे त्रस्त होते. या काळात त्यांनी 48.3 अंशांपर्यंत विक्रमी तापमानही सहन केले.