Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर ०७, २०२०

132 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन बाधितांचा मृत्यू





जिल्ह्यात मागील 24 तासात 151 कोरोनामुक्त


आतापर्यंत 13843 बाधित झाले बरे

Ø उपचार घेत असलेले बाधित 2691

Ø एकूण बाधितांची संख्या 16786


चंद्रपूर, दि. 7 नोव्हेंबर: जिल्ह्यात गत 24 तासात 151 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 132 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये बल्लारपूर शहरातील मौलाना आझाद वार्ड येथील 46 वर्षीय पुरुष, कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील 70 वर्षीय पुरुष व भाकर्डी येथील 38 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 252 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 236, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली सात, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 132 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 16 हजार 786 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 151 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 13 हजार 843 झाली आहे. सध्या 2 हजार 691 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 25 हजार 628 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 7 हजार 239 नमुने निगेटीव्ह आले आहे.





तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 132 बाधितांमध्ये 87 पुरुष व 45 महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परीसरातील 58, पोंभुर्णा तालुक्यातील तीन, बल्लारपूर तालुक्यातील दोन, चिमूर तालुक्यातील पाच, मुल तालुक्यातील चार, गोंडपिपरी तालुक्यातील चार, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील आठ, ब्रह्मपुरी तालुक्यातील 14,  नागभीड तालुक्‍यातील 11, वरोरा तालुक्यातील दोन,भद्रावती तालुक्यातील 9, सिंदेवाही तालुक्यातील दोन, राजुरा तालुक्यातील आठ तर गडचिरोली येथील एक असे एकूण 132 बाधित पुढे आले आहे.





या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:





चंद्रपूर शहरातील व परिसरातील अंचलेश्वर वार्ड, ऊर्जानगर, घुग्घुस, नानाजी नगर, देशपांडे वाडी, शक्तिनगर, महेश नगर, पत्रकार नगर, पडोली, समाधी वार्ड, नगीना बाग, बगड खिडकी परिसर, महाकाली कॉलरी परिसर, दुर्गापुर, शिवाजीनगर, वडगाव, रामनगर, सरकार नगर, संजय नगर, जटपुरा गेट परिसर, इंदिरानगर, सिस्टर कॉलनी परिसर जुनोना चौक, बाबुपेठ भागातून बाधित पुढे आले आहे.





ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील शिवनगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील जवाहर नगर, नगर परिषद परिसर, सास्ती, हनुमान नगर, इंदिरा नगर, धोपटाळा, रामनगर कॉलनी भागातून बाधित पुढे आले आहे.

वरोरा तालुक्यातील  साई मंगल कार्यालय परिसरातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील देलनवाडी, पिपर्डा, नवेगाव, गुजरी वार्ड, बालाजी वार्ड, तोरगाव खुर्द, शांतीनगर परिसरातून बाधित ठरले आहे.

 

भद्रावती तालुक्यातील सुरक्षा नगर, राधाकृष्ण कॉलनी परिसर, डिफेन्स चांदा परिसर, माजरी, आष्टा, जैन मंदिर रोड,परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव, शिवनगर, चावडेश्वरी मंदिर परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. चिमूर तालुक्यातील नेताजी वार्ड, वडाळा पैकु भागातून बाधित पुढे आले आहे.

मुल तालुक्यातील वार्ड नंबर 15, वार्ड नंबर 17, परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील जनता कॉलेज परिसर, शिवाजी चौक, विद्या नगरी भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर, विद्यानगरी,माठा भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.