Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी १७, २०२१

लसीकरण मोहिम १०० टक्के यशस्वी होणार - आ. किशोर जोरगेवार

लसीकरण मोहिम १०० टक्के यशस्वी होणार - आ. किशोर जोरगेवार


आज पासुन लसीकरणाला सुरुवात

चंद्रपूर : चंद्रपूरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्यात हि लस आरोग्य विभागात सेवा देणाऱ्या कोरोना योध्दांना देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व सामान्यांनाही लस देण्यात येणार आहे. या करीता यंत्रणा सज्ज असून कोविड -१९ चा पराजय करण्याची हि मोहिम अधिकारी व कर्मचा-यांच्या उत्तम नियोजनातुन १०० टक्के यशस्वी होणार असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.
आज पासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून या करीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, नागपूर येथील आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ.श्रीराम गोगुलवार, वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, आय.एम.ए. चे डॉ. अनिल माडुरवार, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदिप गेडाम, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
      वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर सोनारकर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोज देण्यात आला . २८ दिवसानंतर या लसीचा दुसरा डोज दिल्या जाणार आहे. आज या उपक्रमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी लसीकरण मोहिमेसाठी प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या तयारीची माहिती जाणून घेत नियोजनाचे कौतूक केले. आजवर ची ही सर्वात मोठी मोहिम असून ती यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागासह संबधीत सर्व विभाग युध्द पातळीवर काम करत आहे. या मोहिमेत शासन स्थळावर येणा-या अडचणी सोडविण्यासाठी आम्हीही कटिबध्द असल्याचे यावेळी आ. जोरगेवार यांनी सांगीलते.या लसीची प्रतीक्षा देशवासीयांना होती. हि लस आता तयार झाली आहे. मात्र ती सर्व सर्वसामान्यांन पर्यन्त पोहचविण्याचे मोठे आव्हाहन प्रशासनासमोर आहे. आरोग्य विभाग व संबंधित सर्व विभागातील  कर्मचारी हे आव्हाहन स्वीकारून हि मोहीम  यशस्वी रित्या पार पाडतील अशी आशाही यावेळी आ. जोरगेवार यांनी व्यक्त केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.