# कॉन्सन्टेटॉर मशीन (ऑक्सीजन) भेट
# काटोल तालुका मध्ये शनिवारला सात 7 पोसिटीव्ह
# तालुका एकूण Positive 1263, मृत 35, सध्या उपचार करणारे 65
सुधीर बुटे
काटोल : श्री नवदुर्गा प्रदर्शनी मंडळ दुर्गा चौक तार बाजार यांनी स्थानिक ग्रामीण रुग्णालयाला रुग्णाला हवेतून ऑक्सीजन पुरवठा करणारी (कॉन्सन्टेटोर) मशीन व गळा व घसा करिता सोकॅशन मशीन भेट दिली आहे. करोना काळात काटोल शहरात मोठ्या प्रमाणात पोसिटीव्ह रुग्ण निघाले होते. याकरिता व्यापारी व मंडळाचे विशेष सहकार्य लाभले. बाजारपेठ सुद्धा वेळावेळी बंद ठेवण्यात आल्या होते. सिनेटायझर , हजारो माक्स आदी कार्यात मानवता दृष्टीकोन ठेऊन योदन दिले होते. ग्रामीण रुग्णालयात हवेतून ऑक्सीजन पुरवठा करणारी व घसा साफ करणारी मशीनची आवश्यकता होती. यावर्षी नवरात्र कार्यक्रम रद्द केल्याने मंडळाचे जेष्ठ व युवा कार्यकर्त्यांनी योगदान देऊन जनतेचे उपयोगात येणारे वैधकीय सयंत्र रुग्णालयास देऊन समाजाला उदारता, समाज सेवेची संदेश दिला आहे. ग्रामीण रुग्णालय काटोल येथे शनिवारला बाजारपेठ बंद असते त्यांनी
वैधकीय अधीक्षक डॉ दिनेश डवरे, वैधकीय अधीकारी डॉ नरेंद्र डोमके, डॉ सुधीर वाघमारे, डॉ अभिलाष एकलारे, डॉ पुंड मॅडम, डॉ पखाके मॅडम, मसराम सिस्टर, फॉरमिस्ट अजय मोरे,प्रणय होले, नितीन निर्मल आदी उपस्थित होते. प्रायोजक श्री नवदुर्गा प्रदर्शनी मंडळाचे काटोल वासीयांनी स्वागत केले आहे.
काटोल तालुक्यात 7 Positive
काटोल तालुक्यात गेल्या पंधरवाड्या नंतर नवीन सात 7 पोसिटीव्ह मिळाले यात काटोल शहरात पंचवटी 3 , फैलपुरा व लक्ष्मीनगर प्रत्येकी 1 असे पाच तर ग्रार्मिण भागात रिधोरा व डोरली येथे प्रत्येकी एक असे शहर व ग्रामीण भागात नवीन सात पोसिटीव्ह मिळाल्याचे डॉ सुधीर वाघमारे यांनी सांगितले. यापूर्वी आठवड्यात एखादे रुग्ण निघत होते आज आठवड्यात उच्चांक गाठला असल्याचे दिसून येते.तालुक्यात एकूण 1263 पोसिटीव्ह , उपचार करीत असलेले 65, दुरुस्त 1163 तर मृतक 35 यात शहरी 25 व ग्रामीण 10 मृतकाचा समावेश आहे.