Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर ०१, २०२०

दीक्षाभूमी स्तुपाच्या विकासाचा मार्ग झाला मोकळा :

 ना. नितीनजी गडकरी यांचे प्रयत्नाने भाजपा नेत्यांनी मानले गडकरी साहेबांचे आभार 



नागपूर ता. १ - केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचे निर्देशान्वये उर्वरित  निधी मिळाल्याने दीक्षाभूमी स्तुपाच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्याप्रित्यर्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आणि शॅाल - पुष्पगुच्छ देवून  त्यांचा  सत्कार करण्यात आला.

       देशच नव्हे तर जगातील बौद्धांचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमी स्तूपाचे नुतनीकरण, रखरखाव तसेच परिसरातील इतर विकासकामांकरिता केंद्र शासनाच्या डॅा. आंबेडकर फाऊंडेशन ने सुमारे साडेनऊ करोड रूपयांच्या निधीस जाने. 2016 मध्ये  मान्यता देवून त्यापैकी 4 कोटी,70 लाख,69 हजाराचा निधी त्याच वर्षात नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुपुर्द करण्यात आला.असे असतांना, नोडल एजंसी ने प्रत्यक्षात जून, 2018 ला कामाचे कार्यादेश जारी केलेत.  फेब्रुवारी 2020 च्या दुसऱ्या आठवडयात फाउंडेशन चे उपाध्यक्ष अशोक मेंढे यांनी दिक्षाभूमी ला भेट देवून कामाची पाहणी केली. तेव्हा उर्वरित निधी मिळावा, म्हणून NMRDA ने त्यांचे लक्ष वेधले. पण अश्यातच उदभवलेल्या कोरोना महामारीमुळे शासकीय कामे प्रभावित झालीत, कोविद वर नियंत्रण , जनतेचा बचाव व सुरक्षा कामास शासन-प्रशासनातर्फे सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. तरीही यातून प्रशासनास थोडी उसंत मिळताच दीक्षाभूमी बाबत असलेल्या आस्थेपोटी ज्येष्ठ केंद्रिय मंत्री मा. नितीन जी गडकरी यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घातल्याने उर्वरित निधी हा NMRDA च्या खात्यात नुकताच वर्ग करण्यात आले.  त्याकरीता आज, भारतीय जनता पार्टीच्या वतीने नामदार मा. नितीनजी गडकरी यांचे आभार मानण्यात आले.

         याप्रसंगी, डॅा. आंबेडकर फाऊंडेशन चे उपाध्यक्ष अशोकराव मेंढे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम, मनपा सत्ता पक्ष नेते संदीपजी जाधव, जिल्हा भाजप अध्यक्ष अरविंदजी गजभिये, अनु. जाती मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, मोर्चा प्रदेश सचिव सतीश शिरसवान, मोर्चा शहराध्यक्ष राजेश हाथीबेड, मोर्चा जिल्हाध्यक्ष अंबादास उके, शहर मंत्री ॲड. राहूल झांबरे, नगरसेवक नागेश सहारे प्रामुख्याने उपस्थित होते.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.