Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर ०९, २०२०

चार व्याघ्र प्रकल्पांतील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

नागपूर: राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने विदर्भातील चार व्याघ्र प्रकल्पावरील स्थानिक सल्लागार समित्यांवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या बुधवारी एका आदेशातून रद्द केल्या आहेत. या चार व्याघ्र प्रकल्पांमध्ये मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा आणि बोर या व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे.

राज्य शासनाने २०१२ पासून या समित्या गठित करण्याचे धोरण आखले होते. राज्याचे निसर्ग पर्यटनाबाबतचे धोरण २० फेब्रुवारी २००८ ला जाहीर झाले. त्यानुसार राज्यात निसर्ग पर्यटन राखविण्यात येत होते. नंतरच्या काळात झालेल्या एका जनहित याचिकेमधील निर्णयानंतर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलभ ३८ ओ (१ (C ) मधील व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाशी संबंधित मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या होत्या.

त्यानंतर ९ नोव्हेंबर २०१२ नुसार मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली होती. त्यानुसार, व्याघ्र प्रकल्पाच्या सभोवतालच्या क्षेत्रातील पर्यटन (सोयोसुविधा) उद्योगांकडून शुल्क आकारुन त्या संबंधात निर्णय घेऊन मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून स्थानिक जनतेच्या उपजीविकेचा विकास करण्याची तरतुद करण्यात आलीौ आहे. 

त्यासाठी स्थानिकसल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी १५ डिसेंबर २०१७ ला हो समिती स्थापन करण्यात आली होती.मेळघाट व नवेगाब-नागझिरा प्रकल्पासाठी ६ फेब्रुवारी २०१८ आणि पेंच व बोर प्रकल्पासाठी ६ सप्टेंबर २०१९८ ला स्थापन करण्यात आली होती.मात्र या नव्या आदेशानुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वगळता अन्य चारही प्रकल्पातील समित्यांवरील अशासकीय नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.