जुन्नर /आनंद कांबळे
कोरोनाच्या काळात आपल्याच गावात कृषी महाविद्यालयातील कृषी दुताने दिले कृषी शिक्षणाचे धडे...आज जगाचा पोशिंदा अडचणीत असताना त्यांना आधुनिकतेची कास धरत आता संकटाला सामोरे जात त्यावर मात करा असा सल्ला देत पुढील काही महिने आपल्याबरोबर राहत कृषी शिक्षण आणि मार्गदर्शन करणार असल्याचे कृषीदूत मुकुंदराजे रेंगडे यांनी जाहीर केले आहे.
गोद्रे येथे फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण संचालित कृषी महाविद्यालय यांच्या वतीने कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी कार्यानुभव कार्यक्रम ग्रामीण भागात घेणे बंधनकारक असते. परंतु कोरोना सारखा संसर्गजन्य रोग आल्याने आता कृषी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना स्थानिक भागात म्हणजेच स्वतःच्या गावात हा कार्यक्रम घेण्याचे आदेश दिले आहेत. गोद्रे येथील कृषिदूत मुकुंदराजे गणपत रेंगडे यांनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत सामाजिक अंतर ठेवून कृषी मार्गदर्शन व पिकाबाबत माहिती दिली. या कार्यक्रमला प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर व कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. अाडत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या कार्यक्रमाचे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी स्वागत केले आहे.तसेच या कार्यक्रमात माजी सरपंच भिमाजी उतळे , विद्यमान सरपंच विनोद रेंगडे,ग्रामसेविका मनिषा डामसे व सर्व ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले याबद्दल सर्वांना धन्यवाद तसेच गावातील सर्व शेतकर्यांनी माहीती आधुनिक व सेंदिय शेती कशी करावी ही माहीती कृषिदूत मुकुंदराजे रेंगडे यांसकडून समजुन घेतली.